Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
News , Events and Happenings in VileParle
पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्र - मार्च २०१७ चे कार्यक्रम
Upcoming Events In Parle

पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्र - मार्च २०१७ चे कार्यक्रम

११,१२ मार्च २०१७ - वित्तापेठ २०१७- अर्थतज्ज्ञांची मांदियाळी :
वेळ : सकाळी १०. ०० ते दुपारी १. ०० , दुपारी २ ते सायंकाळी ५
दोन्ही दिवशी गुंतवणूक संबंधित विषयांवर १२ सत्रे घेतली जातील.
नोंदणी प्रवेश शुल्क रु. ३००/-
पु. ल. देशपांडे सभागृह , टिळ्क मंदिर ,विलेपार्ले.

Read more...
 
अभिनव उपक्रम - पालक मैत्री
Upcoming Events In Parle

अभिनव उपक्रम - पालक मैत्री

लोकमान्य सेवा संघ संस्थेच्या कृष्णाबाई खंबदकोण बालक पालक मार्गदर्शन केंद्रातर्फे ‘पालक मैत्री’ हा अभिनव उपक्रम चालू करण्यात येत आहे. या उपक्रमात समृध्द पालकत्वावर चर्चात्मक परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यातील प्रत्येक शनिवारी संध्याकाळी ४ ते ६ ह्या वेळात हा उपक्रम आयोजिला आहे. संस्कार, आहार, मित्र, वेळ, अभ्यास, स्पर्धा इत्यादी विषयांवर ह्या कार्यक्रमात चर्चा होईल.
संपूर्ण कार्यक्रमाचे शुल्क १२०० रुपये आहे. एक दिवसीय परिसंवादाचे शुल्क १५० रुपये आहे.
आपल्याला ह्या उपक्रमात भाग घ्यायचा असेल तर श्रीमती संगीता परब यांच्याशी ०२२ – २६११७१९५ यावर संपर्क साधावा.

Read more...
 
पार्ले कट्टा - फेब्रुवारी २०१७
Upcoming Events In Parle

पार्ले कट्टा - फेब्रुवारी २०१७

paarle kattaदिनांक ४ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता साठ्ये उद्यान विलेपार्ले येथे पार्ले कट्टा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात लोकप्रभाचे संपादक , संरक्षण पत्रकार व विश्लेषक श्री विनायक परब यांची मुलाखत संवादिका : चित्रा वाघ
स्थळ : साठ्ये उद्यान , मालवीय रोड, विलेपार्ले (पु.)

Read more...
 
कलादर्पण ,संवाद डॉक्टरांशी
Upcoming Events In Parle

कलादर्पण 

kaladarpan 2017रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर यांच्या तर्फे दिनांक ४ व ५ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ११ या वेळेत हेडगेवार मैदान , हनुमान रोड ,विलेपार्ले येथे 'कलादर्पण' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा दरम्यान चित्रकला , शिल्पकला , कॅलिग्राफी यांचे सादरीकरण तसेच ओडिसी , कथकली नृत्य , शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताचे गायन व वादन असे कार्यक्रम सादर केले जातील.
शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध हस्तकला वस्तूंचे व चित्राचे प्रदर्शन भरवण्यात येईल. रविवारी सकाळी ११ पासून शालेय विद्यार्थी आणि कलाप्रेमींसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more...
 
खाद्यमेळावा :२०१७
Upcoming Events In Parle

खाद्यमेळावा :२०१७

khadyajatraलोकमान्य सेवा संघातर्फे या वर्षी दिनांक ४ व ५ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत संस्थेच्या सावरकर पटांगणावर खाद्यमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी निरनिराळे पदार्थ घेऊन २५ गाळाधारक पार्लेकरांच्या सेवेसाठी असतील . या स्टॉल्स वर विविध पदार्थाचा आस्वाद खवय्यांना घेता येईल.

Read more...
 
लोकमान्य सेवा संघ , विलेपार्ले यांच्या तर्फे सामाजिक संस्थांचा मेळावा
Upcoming Events In Parle

लोकमान्य सेवा संघ , विलेपार्ले यांच्या तर्फे सामाजिक संस्थांचा मेळावा

दिनांक ४ फेब्रुवारी २०१७ रोजी लोकमान्य सेवा संघ विलेपार्ले यांच्यातर्फे सामाजिक संस्थांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९.३० ते सायंकाळी ४. ३० वाजेपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात श्री शशिकांत साबळे, श्री प्रकाश महाडिक ,श्री दीपक टिकेकर , श्री उमेश श्रीखंडे आदी मान्यवरांची व्याख्याने होतील. कार्यक्रम पुढील प्रमाणे असतील :

Read more...
 
वसंत व्याख्यानमाला
Upcoming Events In Parle

वसंत व्याख्यानमाला

दरवर्षीप्रमाणे विलेपार्ले महिला संघ ग्रंथालय व कु. कृष्णाबाई लिमये वाचनालयातर्फे दिनांक १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी ७ ते ८. ३० या वेळेत २२ व्या वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १५ ते १९ फेब्रुवारी २०१७
कार्यक्रम :
१५ फेब्रुवारी - शिवचरित्राची आजची गरज -
वक्ते - गीता उपासनी 

१६ फेब्रुवारी - जंगलचे राजे रँक कसे ?
वक्ते : जव्हार परिसरातील वनवासींचा सर्वांगीण विकास साधणारे मिलिंद थत्ते.

Read more...
 
फन स्ट्रीट - डहाणूकर कॉलेजच्या कल्चरल कमिटीने आयोजित केलेला अनोखा इव्हेंट
Upcoming Events In Parle

फन स्ट्रीट - डहाणूकर कॉलेजच्या कल्चरल कमिटीने आयोजित केलेला अनोखा इव्हेंट 

Funstreet Gamesलगोरी , आबाधुबी , लंगडी , भोवरा , आंधळी कोशिंबीर ..... या आणि अशा छान विस्मरणात गेलेल्या खेळांनी आज पार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळा जवळचा रास्ता खुलून गेला होता. कारण होते डहाणूकर कॉलेजच्या कल्चरल कमिटीने आयोजित केलेल्या फन स्ट्रीट चे!

आपण लहानपाणी हे सगळे खेळ खेळले असू पण आता डिजिटल जमान्यात आपली मुले या सर्व गंमतींपासून वंचित होत चालली आहेत. याच खेळांना पुन्हा एकदा पुनर्रुज्जीवन देण्याचे काम डहाणूकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केले. २९ जानेवारी रोजी भरवण्यात आलेल्या या फन स्ट्रीट मुळे पार्लेकरांची रविवारच्या दिवसाची सुरुवात एकदम झकास झाली. सागरगोटे , लगोरी , आबाधुबी अशा जुन्या खेळांची मजा पार्लेकरांना अनुभवता आली शिवाय झुंबा , रोड आर्ट , वन मिनिट गेम्स असे खेळही खेळता आले.

Read more...
 
खाद्यमेळावा - २०१७
Upcoming Events In Parle

खाद्यमेळावा - २०१७

khadyajatra photoदरवर्षी प्रमाणे या वर्षीही दिनांक ४ व ५ फेब्रुवारी २०१७ रोजी लोकमान्य सेवा संघातर्फे खाद्यमेळावा आयोजित करण्यात आला आहे. खाद्यमेळाव्यात स्टॉल घ्यायचा असल्यास फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी आहे. फॉर्म संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. दिनांक २२ जानेवारी रोजी गोखले सभागृहात सकाळी १० ते १ या वेळेत फूड टेस्टिंग केले जाईल. ज्यांची स्टॉल साठी निवड झाली असेल त्यांनी २७ जानेवारी पर्यंत पैसे संस्थेच्या कार्यालयात भरायचे आहेत. दिनांक ४ व ५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत खाद्यजत्रा आयोजित करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क :
लोकमान्य सेवा संघ ,फोन :022-26141276

Read more...
 
मॅजेस्टिक गप्पा-२०१७
Upcoming Events In Parle

मॅजेस्टिक गप्पा-२०१७

majestic gappaलोकमान्य सेवा संघाच्या सहकार्याने,मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा  दि. ६ जानेवारी पासून  सुरू होत आहेत. दि. ६ जानेवारी ते  १५ जानेवारी २०१५ या कालावधीतील विलेपार्ले पूर्व येथील लोकमान्य सेवा संघाच्या प्रांगणात सायंकाळी ७.३० वाजल्यापासून वैविध्यपूर्ण विषयांवरील कार्यक्रम सादर केले जातील.या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले आहे.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 10

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla