Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
साठ्ये महाविद्यालयाचे जुलै व ऑगस्ट मधील कार्यक्रम
Past Events in Parle

साठ्ये महाविद्यालयाचे जुलै व ऑगस्ट मधील कार्यक्रम 

sathye collegeदिनांक १७ जुलै २०१४ रोजी भूगोल विभागातर्फे Geographic Information System (GIS) आणि Remote Sensing (RS) या प्रणाली बद्दल माहिती देणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले. ह्या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठातील या विषयासंबंधी तज्ञ असलेल्या डॉ. दीप्ती मुखर्जी उपस्थित होत्या. त्यांनी या कार्यक्रमा प्रसंगी GIS व RS या दोन प्रणालींचा वापर व त्यांचा दैनंदिन वापरातील उपयोग यावर मार्गदर्शन केले.

दिनांक २० जुलै २०१४ रोजी NSS विभागाचा Blue Ribbon हा कार्यक्रम झाला. ज्यामध्ये साठ्ये महाविद्यालयाच्या NSS विभागाच्या ६ सदस्यांची निवड करण्यात आली होती. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना Complain Registration System विषयी माहिती देण्यात आली.

दिनांक २५ जुलै २०१४ रोजी ' नाते मैत्रीचे' हा कार्यक्रम वूमन डेव्हलपमेंट सेल तर्फे आयोजित केलेला होता. ह्या प्रसंगी विवेक काशीकर हे वक्ते म्हणून लाभले होते. त्यांनी प्रेम, मैत्री, स्त्रियांच्या सामाजिक समस्या या विषयांवर बोधपर व्याख्यान दिले . त्याच दिवशी त्वचारोग तज्ञ डॉ. निसर्ग चव्हाण यांनी त्वचेवर होणारया विविध रोगांबद्दल उपौक्त माहिती दिली.

दिनांक २६ जुलै २०१४ रोजी मराठी वाङ्मय मंडळातर्फे 'गटारी थोडी तुमची थोडी आमची ' हा कार्यक्रम आयोजित केला होता. दिव्याची आवास , तिचे मुल स्वरूप व आत्ताच्या काळात तिला आलेले विकृत स्वरूप या सर्वांची माहिती अत्यंत सुंदर पद्धतीने एका नाटक द्वारे दाखवण्यात आली होती. तसेच या विषयासंबंधी स्वरचित कवितांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.

दिनांक ३० जुलै रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात 'रेगे' या चित्रपटाच्या पूर्व प्रसिद्धीसाठी चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक श्री. अभिजित पानसे' आणि चित्रपटातील अभिनेते श्रि. संतोष जुवेकर व श्री आरोह वेलणकर हे उपस्थित होते.

दिनांक ४ ऑगस्ट २०१४ रोजी मराठी वाड्मय मंडळातर्फे वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. टिळक पुण्यातीथिचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या स्पर्धेला मुंबई विद्यापीठातील मराठीच्या प्राध्यापिका डॉ. अलका मटकर आणि साठ्ये महाविद्यालय (कनिष्ठ) मराठी विषयाचे प्राध्यापक श्री रघुनाथ शेतकर हे परीक्षक म्हणून लाभले होते. ह्या स्पर्धेत कु. ऐश्वर्या धनवडे ह्या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आला. स्पर्धेअंती लोकमान्य टिळक व त्यांचे विविध पैलू एका लहान नाटुकली मधून समर्पकपणे दाखवले गेले.

दिनांक ७,८,९ ला युवक बिरादरी उपक्रमामध्ये साठ्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला.

९ ऑगस्ट रोजी भवन्स कॉलेज चर्चगेट ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी रेली काढण्यात आली या क्रयाक्रमाचा मुळ उद्देश जल, वायू आणि अग्नी बचाव हा होता.

दिनांक १२, १३ ऑगस्ट रोजी BMM विभागातर्फे Electronic Media या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्यात Electronic Media मधील तज्ञ श्रि. प्रशांत कदम , श्री. विशाल पाटील आणि साम मराठी चे हेड श्री चंद्रमोहन पुपाला हे तज्ञ म्हणून उपस्थित होते.

दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साठ्ये महाविद्यालयात मोठ्या जोशात साजरा झाला. प्राचार्या डॉ. कविता रेगे यांच्या हस्ते द्वाजारोहण झाले. NCC UNIT च्या विद्यार्थ्यांच्या परेड ने लष्करी शिस्तीचे दर्शन घडवले.
महाविद्यालयाच्या ग्रंथालयात झालेल्या कार्यक्रमात सर्वप्रथम प्राचार्यांचे विचार प्रवर्तक भाषण झाले. नजीकच्या काळात निवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा सत्कार झाला. बारावी व पदवी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. कार्यक्रमाअंती राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

-ऐश्वर्या धनवडे

 --
-
Regards


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla