Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
विलेपार्ले येथे उद्यापासून संतांची मांदियाळी
Past Events in Parle

विलेपार्ले येथे उद्यापासून संतांची मांदियाळी

श्री गजानन महाराज (शेगाव) भक्त मंडळ आणि लोकमान्य सेवा संघ यांनी संयुक्तपणे १ ते ५ डिसेंबर या काळात विलेपार्ले येथे ' संतांची मांदियाळी ' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संत साहित्य आणि संबंधित विषयावर दररोज सायंकाळी मान्यवर तज्ज्ञ व्याख्यान देणार आहेत.

लोकमान्य सेवा संघाच्या पटांगणात दररोज सायंकाळी ७.४५ वाजता व्याख्यानाला सुरू होईल. रविवार , १ डिसेंबर रोजी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दिनी डॉ. रवीन थत्ते हे ' ज्ञानेश्वरीतील विज्ञान ' हा विषय उलगडून दाखवतील. तर सोमवार , २ डिसेंबर रोजी वामन देशपांडे यांचे ' देखीला अक्षरांचा मेळावा ' या विषयावर व्याख्यान होईल. मंगळवार , ३ डिसेंबर रोजी ' शिवशाहीतील दोन श्रेष्ठ संत ' या विषयावर डॉ. मुकुंद दातार तर बुधवार , ४ डिसेंबर रोजी ' नाथांची भारुडे आणि गवळणी ' या विषयावर डॉ. रामचंद्र देखणे विवेचन करतील.

गुरुवार , ५ डिसेंबर रोजी ' नर्मदा परीक्रमा ' या विषयावर प्रतिभा चितळे यांचे व्याख्यान होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जान्हवी गद्रे आणि श्रीनिवास गोगटे करतील. श्रोत्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे , असे आवाहन माधव जोशी , मधुसूदन जोशी , मुकुंद रानडे यांनी केले आहे. संपर्क : २६८४६४४४.


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla