Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
पार्ले महोत्सव-२१ ते ३० डिसेंबर
Past Events in Parle

पार्ले महोत्सवात ३८ स्पर्धा
२१ ते ३० डिसेंबरला रंगणार महोत्सव

गेली सलग १३ वर्षे मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला ' पार्ले महोत्सव ' यंदा २१ ते ३० डिसेंबर या काळात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ३८ प्रकारच्या कला व क्रीडा स्पर्धा होणार असून ४०० प्रथम पारितोषिकांसह सुमारे दोन हजार बक्षिसे देण्यात येणार आहेत. तान्ह्या बाळापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना आपले कलागुण दाखवण्यास वाव असलेल्या या महोत्सवाचा मीडिया पार्टनर महाराष्ट्र टाइम्स आहे.

कला , सांस्कृतिक , मैदानी खेळ , इनडोअर गेम्स , वैशिष्टयपूर्ण स्पर्धा अशा पाच विभागात या स्पर्धा होतील. तर २२ डिसेंबरला सर्वाधिक स्पर्धकांचा सहभाग असणारी मॅरेथॉन सकाळी सात वाजता होणार आहे. कला विभागात चित्रकला , व्यंगचित्र , मेंदी , रांगोळी , सांस्कृतिक विभागात स्वरचित काव्यवाचन , अंताक्षरी , नृत्य , युगल नृत्य , समूहनृत्य , मराठी व हिंदी गायन , एकपात्री प्रयोग , वक्तृत्व स्पर्धा , मैदानी खेळामध्ये फुटबॉल , बॉक्स क्रिकेट , ओव्हरआर्म क्रिकेट , कबड्डी , व्हॉलीबॉल , थ्रोबॉल , खोखो , मल्लखांब , योगासने , शरीरसौष्ठव , ५० मीटर धावणे , गोळाफेक , रस्सीखेच तर इनडोअर गेम विभागात कॅरम , बुद्धीबळ , टेबलटेनिस , बॅटमिंटन , रायफल शूटिंग आणि वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धेत महिलांसाठी होम मिनिस्टर , ज्येष्ठ नागरिक , सुदृढ बालक , भारत को जानो प्रश्नोत्तर स्पर्धा आयोजित केली आहे. मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठीच हे व्यासपीठ असून अनेक कलावंत , क्रीडापटूंना अशा स्पर्धांमुळे आपल्या करिअरचे क्षेत्र निवडता येते. दरवर्षीप्रमाणे , या महोत्सवात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी व्हावे , असे आवाहन महोत्सवाचे प्रमुख आयोजक पराग अळवणी यांनी केले आहे.

या महोत्सवातील सहभागासाठी संपर्क ः www.parlemahotsav.com अथवा भाजप कार्यालय , चित्तरंजन रोड , विलेपार्ले (पू.) फोनः २६१३६५१३.


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla