Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
पार्ले कट्ट्यावर मनीषा म्हैसकर
Past Events in Parle

पार्ले कट्ट्यावर मनीषा म्हैसकर

1384003926876पार्ले कट्टा पावसाळ्याच्या विश्रांती नंतर नोव्हेंबर पासून सुरु झाला आहे . दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी असणारा पार्ले कट्टा यावेळी दिवाळी मुळे दुसऱ्या शनिवारी म्हणजे ९ नोव्हेंबर ला आयोजित करण्यात आला. या सत्रातील पहिल्या कार्यक्रमात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांच्याशी डॉ. अनुया पालकर यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

त्या म्हणाल्या माझा जन्म पुण्यातला पण माझं सर्व शिक्षण मात्र नागपूरमध्ये झालं. सर्वसाधारणपणे चौकोनी मध्यमवर्गीय असं आमचं कुटुंब. आई लेक्चरर व वडील सनदी सेवेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संस्कारांचं बाळकडू लहानपणापासून आम्हाला मिळालं होतं.

त्यांच्या या करियर विषयी विचारले असता त्या म्हणाल्या ,साधारण ८० च्या दशकात जर मुलगी मेरीट मध्ये आली तर तिने मेडिकल ला जायचं असा त्यावेळचा ट्रेंड होता . तशी त्यांनी मेडिकल ला अॅडमिशन पण घेतली होती पण नंतर त्या त्यांच्या वडिलांबरोबर एका सेमिनार ला गेल्या आणि तिथे लेक्चर्स ऐकल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यांना प्रशासकीय सेवेत जायचं आहे. आयएएस व्हायचं आहे.

स्त्रिया हि त्यांच्या क्षेत्रात उत्तम काम करतात हे सांगतातना त्यांनी एक आठवण सांगितली , पूर्वी मतदानाच्या वेळी मतमोजणी हाताने करावी लागे. मतमोजणी साठी कर्मचारी निवडताना त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांनी स्त्रियांना वगळले होते हे सांगून कि रात्रभर मतमोजणी करावी लागते तर स्त्रिया हे करू शकणार नाहीत पण त्यांच्या सांगण्यावरून काही स्त्रियांची या कामासाठी निवड झाली आणि शेवटी असे झाले कि पुरुष कर्मचाऱ्यांपेक्षा स्त्रियांनी ते काम २ तास आधी संपवले .

1383999663473त्यांच्या मते कोणताही स्टाफ हा डिपार्टमेंटचा कणा असतो. अधिकारी बऱ्याचदा स्टाफशी संवाद साधत नाहीत. पण स्टाफला बोलतं केलं की त्यांच्याकडून अनेक गोष्टी आपल्याला माहिती होतात. स्टाफकडून डिपार्टमेंटबद्दल खूप माहिती किंवा बारकावे जाणून घेता येतात. त्यामुळे कुठलंही काम करताना स्टाफच्या मदतीने ते करणं अधिक सोप्पं होतं.

दोघंही नवरा-बायको एकाच क्षेत्रात असल्यामुळे तुम्ही घरी आल्यावर गप्पा कोणत्या विषयावर मारता किंव्हा संवाद कसे असतात या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या आम्ही दोघेही एकाच क्षेत्रात असल्याने जीआर किंवा ऑर्डर अशा गप्पा ओघाने आमच्यात होतातच. पण आमच्या दोघांच्या कामामध्ये प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडत असतं. पण हे असं असलं तरी सकाळी एक तास विदाउट फेल आम्ही एकत्र वॉक घेतोच. या वॉकमध्ये माझं काम-त्याचं काम अशा अनेक गोष्टींची चर्चा होते.

त्यांची एक आठवण सांगताना त्या म्हणाल्या आमचं नुकतंच लग्न झालेलं होतं. त्या वेळी आमच्या घरी एक अधिकारी जेवायला आले होते. जेवण झाल्यावर ते जाताना म्हणाले, तुमच्या दोघांचं एकच क्षेत्र, हे आहे सर्व छान पण एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. हे ऐकल्यावर ती संपूर्ण रात्र मला झोपच आली नव्हती. पण आज मात्र मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की, आमच्या लग्नाला २० वर्षे झालीत.
तरुणांना काय सांगावस वाटत यावर त्या म्हणाल्या वेळेच व्यवस्थित नियोजन करून प्रामाणिक पणे काम केल तर यश नक्कीच मिळते .आपल्यामध्ये कुठले गुण आहेत, याची आपल्याला जाण हवी. आपल्या क्षमतेची जाणीव आपल्याला झाली की अनेक गोष्टी सहजसाध्य होतात.

- Townparle.com Team 

 

पार्ले कट्ट्यावरील मागील कार्यक्रम :
पार्ले कट्ट्यात अशोक हांडे
पार्ले कट्ट्यावर 'आठवणीतले बाळासाहेब'
पार्ले कट्टा आणि सत्यमेव जयते

 

 

तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.
संपर्क  :Email : 
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla