Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
त्रिदशकपूर्ती वर्षारंभ कार्यक्रम -शिवमहोत्सव २०१७
Upcoming Events In Parle

त्रिदशकपूर्ती वर्षारंभ कार्यक्रम -शिवमहोत्सव २०१७

shivaraiयेत्या १८ मार्च २०१७ या दिवशी जनसेवा समिति संस्था ३० व्या वर्षात पदार्पण करीत आहे.कोणत्याही सामाजिक संस्थेसाठी ही निश्चितच ही अभिमानाची घटना आहे.संस्थेच्या त्रिदशकपूर्ती वर्षारंभ आपण मोठ्या दणक्यात साजरा करायचा ठरवला आहे.

अर्थात याचा आरंभ आपण शनिवार दि १८ मार्च २०१७ आणि रविवार दि १९ मार्च २०१७ हे दोन दिवस शिवमहोत्सव-२०१७  या कार्यक्रमाचे आयोजन करून आपण करणार आहोत.या शिवमहोत्सवात खालील कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

 

दि १८ आणि १९ मार्च २०१७ – सकाळी १० ते रात्रौ ९ पर्यंत 

“दुर्गदुर्गेश्वर रायगड” शिवतीर्थ रायगडाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन

दि १८ मार्च २०१७ – सायंकाळी ५.३० ते ७.३० *“स्वराज्य ते साम्राज्य – थोरले बाजीराव पेशवे यांची यशोगाथा”* - वक्ते- सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक आणि लेखक, डॉ. उदय कुलकर्णी

दि १९ मार्च २०१७ – सायंकाळी ५.३० ते ६.३० – *“गीतदुर्गायन”* शिवरायांच्या गड-किल्ल्यांवर आधारित सुश्राव्य दुर्गगीतांचा आणि स्लाईडशोचा अनोखा कार्यक्रम ! सादरकर्ते – सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सौ माधुरी करमरकर व गीतकार, संगीतकार श्री मिलिंद करमरकर

 दि १९ मार्च २०१७ – सायंकाळी ६.३० ते ८ – महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार आणि त्यांचे ‘शिवचरित्रावर’ व्याख्यान !

वरील सर्व कार्यक्रम दोन्ही दिवस विलरपार्ले पूर्व येथील साठ्ये महाविद्यलाय(पार्ले कॉलेज)पटांगणावर संपन्न होणार आहेत.संस्थेच्या या ३० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे आपण महत्वपूर्ण घटक आणि साक्षीदार आहात म्हणूनच या दोनही दिवसांच्या कार्यक्रमांना आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे!

आपले कृपाभिलाषी,

पराग लिमये आणि परेश बगडे

कार्यवाह-जनसेवा समिती, विलेपारले

अधिक माहितीसाठी संपर्क

९९८७५६५७३८, ९८६९३४४७७७


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla