Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
News and Updates in VileParle
पार्लेकरांना पार्ल्यात काय काय हवे आहे ?
VileParle News

पार्लेकरांना पार्ल्यात काय काय हवे आहे ?

लोकांनी विश्वास दाखवून निवडून दिलेल्या सर्वच नवनिर्वाचित नगरसेवकांचे www.townparle.com तर्फे अभिनंदन! पण त्यांच्यावर याच लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी मात्र आली आहे. तेंव्हा पार्ल्याला आणि आपल्या प्रभागाला सर्वात सुंदर उपनगर बनवणे हा ध्यास घेऊन कमला सुरुवात करावी अशी प्रत्येक पार्लेकरांची आपणाकडून अपेक्षा असेल.

अशाच जोशी काका , साने काका, राणे काकू , आणि अशाच तमाम पार्लेकरांच्या आपणाकडून असणाऱ्या काही अपेक्षा खाली नमूद करण्याचा आम्ही प्रयत केला आहे. 

roads१. 
पार्ल्यात उत्तम रस्त्यांची सोय करावी -
 पार्ल्यातील बऱ्याच रस्त्यांवर भरपूर खड्डे असतात. कित्येक वेळा त्यावरून जाताना २ व्हीलर चालवणाऱ्यांची आणि रिक्षातून जाणाऱ्यांचीही खूप पंचाईत होते. काही ठिकाणी फार छोटे छोटे खड्डे जरी असले तरी रात्रीच्या वेळी ते न दिसल्याने बरेच छोटे मोठे अपघाताचे प्रसंगही येतात. त्यामुळे सगळ्यात आधी नगरसेवकांनी आपापल्या विभागातल्या रस्त्याना नवी चकाकी देणे. अगदी सिमेंटचे गुळगुळीत नसले तरी डांबराचे सरळसोट रस्ते असावेत कारण पेव्हर ब्लॉक लावलेल्या रस्त्यांमधील एक एक ब्लॉक कधी निसटतो आणि रस्ता खड्डेमय कधी होतो हे ध्यानातही येत नाही तरीही पेव्हर ब्लॉक गरजेचे असतील तर त्याची नीट काळजी घेतली जाईल ते कृपया पाहणे.

Read more...
 
पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे एप्रिल २०१७ चे कार्यक्रम
VileParle News

पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे एप्रिल २०१७ चे कार्यक्रम

१ एप्रिल २०१७ - आर्थिक वर्षाअखेरीकचे गुंतवणुकीचे डॉक्युमेंटेशन
वक्ते : श्री अशोक ढेरे
स्थळ : लोकमान्य सेवा संघ , गोखले सभागृह . वेळ : सकाळी ११ ते १२. ३०
समभाग पुनः खरेदी (सोदाहरण)
वक्ते : सी. ए. शेखर प्रभुदेसाई

Read more...
 
लोकमान्य सेवा संघाच्या नागरिक दक्षता शाखेतर्फे नगरसेवकांचा सत्कार
VileParle News

लोकमान्य सेवा संघाच्या नागरिक दक्षता शाखेतर्फे नगरसेवकांचा सत्कार

nagarasevakancha satkarलोकमान्य सेवा संघ संस्थेतर्फे विलेपार्ले (पूर्व) विभागातील नवनिर्वाचित नगरसेवक सौ. ज्योती अळवणी व श्री. अभिजीत सामंत यांचा सत्कार बुधवार दि. १५ मार्च रोजी, संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकुंद चितळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या सत्कार समारंभास विलेपार्ल्यातील मान्यवर आणि नागरिकांनी आवर्जून उपस्थिती लावली.
नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सत्कार हा काही नविन गोष्ट नाही, मग या सत्कार समारंभाचे वैशिष्ठय काय होते? त्यामागची संकल्पना काय होती? लोकमान्य सेवा संघ नेहमीच नाविन्यपूर्ण कल्पना राबवण्यात अग्रेसर असतो. संघाच्या नागरिक दक्षता शाखेतर्फे अभिनव असे “इ कचरा” गोळा करण्याचे केंद्र चालवले जाते. या उपक्रमास केवळ विलेपार्लेच नव्हे तर इतर उपनगरातूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे निनिराळ्या गृहसंकुलाशी संपर्क साधून, घरोघरीची रद्दी गोळा केली जाते. ही रद्दी विकून जमा झालेल्या रकमेचा विनियोग कॅसरग्रस्तांसाठी केला जातो.

Read more...
 
विलेपार्ल्यात शास्त्रीय संगीतविषयक शिबिराचे आयोजन
VileParle News

विलेपार्ल्यात शास्त्रीय संगीतविषयक शिबिराचे आयोजन

sitarTanpuraशास्त्रीय संगीताची माहिती आणि जाण वाढवण्यासाठी विलेपार्ल्यात शास्त्रीय संगीतविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात शास्त्रीय संगीतातल्या मूलतत्वांची ओळख , वाद्यांचा प्रत्यक्ष अनुभव , रियाझ इ. विषयी माहिती देण्यात येणार आहे. हे शिबीर २९,३० एप्रिल व १ मी रोजी संपन्न होईल. अधिक माहितीसाठी संपर्क : ९९६७४५७६४४

Read more...
 
साठ्ये महाविद्यालयात बंगाली व उर्दू भाषांचे प्रशिक्षण
VileParle News

साठ्ये महाविद्यालयात बंगाली व उर्दू भाषांचे प्रशिक्षण

साठ्ये महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या पुढाकाराने पुढील महिन्यापासून साठ्ये महाविद्यालयात बंगाली व उर्दू भाषांचे प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमाचा कालावधी ४ व ६ महिने असा असेल. अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रसाद लोंढे - ९९६७८१६६२८

Read more...
 
एकपात्री अभिनय स्पर्धा
VileParle News

एकपात्री अभिनय स्पर्धा

देशस्थ ऋग्वेदी संघातर्फे शनिवार दिनांक २२ एप्रिल २०१७ रोजी एकपात्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा वयोगट २५ ते ४० आणि ४० पासून पुढे अशा स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची वेळ सायंकाळी ४ अशी असेल. प्रत्येक स्पर्धकाला ५ मिनिटे वेळ दिला जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क - ९९८७२२११९० / ९८२१८३०५७४

Read more...
 
मुंबई महानगरपालिका २०१७ - सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे व नगरसेविकांचे हार्दिक अभिनंदन !!
VileParle News

मुंबई महानगरपालिका २०१७ - सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे व नगरसेविकांचे हार्दिक अभिनंदन !!

BMC"विलेपार्ले सुशिक्षित , सुसंकृत लोकांचे उपनगर , पक्ष कोणताही असो उमेदवार , नगरसेवक असा निवडला पाहिजे ज्याने आतापर्यंत पार्ल्यासाठी काहीतरी केले आहे आणि पुढेही पार्ल्याचे आपल्या विभागाचे भले करेल अशी खात्री वाटायला हवी. " जोशी काका साने काकांना सांगत होते. हे ऐकताना एक क्षण खरेच हे म्हणणे पटले. पार्ले - अंधेरी - सांताक्रूझ या परिसरासाठी यंदाच्या निवडणुकीत साधारण १० प्रभाग बनवले गेले होते. प्रभाग ७०,७१,८१,८२,८३,८४,८५,८६,८७,८८. अशी वेगवेगळी प्रभागांची विभागणी केली होती. त्यामुळे उमेदवारांचे भवितव्य या पार्लेकर , अंधेरीकर आणि सांताक्रुझकर यांच्या हातात होते. आपल्या पार्ल्याबद्दल म्हणायचे तर निवडणुकीचा दिवस उजाडला आणि आपले सुजाण पार्लेकर मतदान करायला बाहेर पडले. पण काही जण इच्छा असूनही वोटर्स कार्ड नाही , मतदार यादीत नाव नाही अशा कारणांनी मतदान करू शकले नाहीत. पण तरीही २०१२ च्या मानाने ११. ७०% वाढ होऊन के पूर्व भागात यंदा ६०% मतदान झाले.
16836469 1386370371413841 2911123135600882637 oया वेळी प्रभाग ८५ मधून ज्योती आळवणी (BJP) तर प्रभाग ८४ मधून अभिजित सामंत (BJP) आणि प्रभाग ७० मधून सुनीता मेहता (BJP) ,प्रभाग ७१ मधून अनिश मंक्कानी (BJP),प्रभाग ८१ मुरजी पटेल (BJP),(प्रभाग ८७ मधून विश्वनाथ महाडेश्वर (Shivsena), प्रभाग ८८ मधून सदानंद परब (Shivsena) प्रभाग ८३ मधून विनी डिसुझा (Congress) आणि प्रभाग ८६ मधून सुषमा राय (Congress) यांच्या नावावर पसंतीची मोहोर उमटली .
लोकांनी विश्वास दाखवून निवडून दिलेल्या सर्वच नवनिर्वाचित नगरसेवकांचे www.townparle.com तर्फे अभिनंदन! पण त्यांच्यावर याच लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी मात्र आली आहे. तेंव्हा पार्ल्याला आणि आपल्या प्रभागाला सर्वात सुंदर उपनगर बनवणे हा ध्यास घेऊन कमला सुरुवात करावी अशी प्रत्येक पार्लेकरांची आपणाकडून अपेक्षा असेल.

Read more...
 
ऍक्युप्रेशर प्रशिक्षण शिबीर
VileParle News

ऍक्युप्रेशर प्रशिक्षण शिबीर 

स्वातंत्रवीर सावरकर केंद्रातर्फे १८ वर्षांवरील स्त्री पुरुषांसाठी ऍक्युप्रेशर प्रशिक्षण वर्ग दिनांक २ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
वेळ : सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ ते ८. ३०
अधिक माहितीसाठी संपर्क :
स्वातंत्रवीर सावरकर केंद्र
विलेपार्ले पूर्व , सन सिटी जवळ
२६११५७१२ (सायनकाळी ५.३० ते ८)

Read more...
 
पु. वि . भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे जानेवारी २०१७ चे कार्यक्रम
VileParle News

पु. वि . भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे जानेवारी २०१७ चे कार्यक्रम

८ जानेवारी - निश्चलीकरण आणि आयकर सुधारणा कायदा
वक्ते : सी ए अशोक ढेरे
१५ जानेवारी - वैयक्तिक करनियोजन, इच्छापत्र विषयक व गुंतवणूकदार तक्रार सल्ला
२२ जानेवारी - अर्थसंकल्प २०१७-२०१८ ,गुंतवणूकदारांच्या अपेक्षा
वक्ते : श्री. विनायक कुलकर्णी
स्थळ : साठ्ये सभागृह , तळमजला , लोकमान्य सेवा संघ
वेळ : सकाळी ११ ते १२. ३०

Read more...
 
पार्ल्यात हेरिटेज वॉक
VileParle News

पार्ल्यात हेरिटेज वॉक

दिनांक ८ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ८ वाजता सुरु होणारा हेरिटेज वॉक पार्लेकरांसाठी पार्ल्याचा इतिहास व येथील झाडांविषयी वैशिष्ठ्यपूर्ण व रंजक माहिती मिळवण्यासाठी एक उत्तम संधी असणार आहे. महात्मा गांधी रोड वरील राममंदिरापासून ते हनुमान रोड वरील दत्तमंदिरापर्यंत या वॉकचे आयोजन केले आहे. यात प्रथम नाव नोंदवणाऱ्या ३० लोकांनाच प्रवेश दिला जाईल.
मार्गदर्शक : वनस्पतीतज्ञ डॉ. चंद्रकांत लट्टू व पुरातत्त्वशास्त्र अभ्यासक श्री. संदीप दहिसरकर.
या कार्यक्रमासाठी शुल्क रु. १००/-
नोंदणीसाठी संपर्क : ९९३०७७४२४१

Read more...
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 1 of 6

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla