लग्न जुळवताना पत्रिका जुळणे किती महत्वाचे असते?
Matrimony Articles

लग्न जुळवताना पत्रिका जुळणे किती महत्वाचे असते?

janmkundaliप्रत्येकाला भविष्याच्या गर्भात काय दडलय हे जाणुन घेण्याची तीव्र इच्छा असते. मनुष्याला अनेक स्वप्ने, अनेक ध्येय असतात, ती पुर्ण होतातच असे नाही. आपले स्वप्न, ध्येय पुर्ण होतील का ? हे जाणुन घेण्याची इच्छा ज्योतीषशास्त्राकडे आकर्षीत करते. तसेच जीवनातील अडचणी समस्या दूर होतील का ? केव्हा ? कसे ? हे समजण्यासाठी ज्योतिषशास्त्र हे प्रभावी माध्यम आहे. माणुस जन्माला येतो तो कोरा, पण त्याचासोबत एक अद्रुष्य गोष्ट येते ती म्हणजे प्रारब्ध. यामध्ये जे लिहीलेले असते ते भोग चुकत नाही, ते त्याला भोगावेच लागतात, मग ते सुख असो की दुःख हे आपण केवळ ज्योतिष्य शास्त्राच्या माध्यमातुन पाहू शकतो.
जन्माला आल्यापासुन त्याचा मृत्यु होईपर्यंतची प्रत्येक घटना म्हणजे शिक्षण, विवाह, संतती, नोकरी इ. सर्व घटनांचे मार्गदर्शन आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातुन घेता येते. ज्योतिष हे वेद, पुराणापासुन आलेले शास्त्र आहे. वेदचक्षु असे ज्योतिष शास्त्राला संबोधले जाते. ज्योतिष शास्त्र हे भविष्य जाणण्याचे एकमेव शास्त्र आहे.

भविष्य पाहण्याच्या अनेक पध्दती आहेत. पारंपारिक, कृष्णमुर्ती, हस्तसामुहिक, अशा पध्दती आहेत.

 

विवाहाचा प्रश्न असेल तर विवाह केव्हा होणार? वैवाहिक जिवन कसे असेल ? पती/पत्नी (जोडीदार) दिसायला कसे असेल? त्याचा स्वभाव कसा असेल ? वागणे कसे असेल ? जोडीदार कोणत्या दिशेचा असेल? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात येतात .

गुणमेलन 

kundali-sthanविवाह जमवण्याची सुरवात होते ती पत्रिका पहाण्यापासुन मग आपण आपल्या मुलाची/मुलीची पत्रिका घेऊन ज्योतिषाकडे जातो. तो ज्योतिषि पत्रिकेतील गुण किती जुळतात आणि मंगळदोष आहे कि नाहि यावरच भर देतो. त्यामुळे अनेक ठिकाणी पत्रिका जमुनही संसार सुखी झालेला दिसत नाहि. असे का होते तर त्याचे कारण म्हणजे गुण जास्त स्वभावाशी संबधित असतो. म्हणुन आपण गुणमेलना बरोबर ग्रहमेलनहि पाहणे जास्त महत्वाचे आहे. मग हे ग्रहमेलन म्हणजे काय ? तर यात खालिल गोष्टींचा विचार केला जातो.

१) वैवाहिक सुख – विवाहानंतर या दोघानां वैवाहिक सुख मिळेल कि नाही ? याचे प्रमाण ठरवुन दोन्ही पत्रिका जुळवल्या जातात.

२) संपत्ती – दोन्ही पत्रिकांना संपत्ती होण्याचा एकंदर कालावधी विचारात घेऊन संपत्ती सुख कसे असेल हे पाहिले जाते.

३) आजारपण – भविष्य काळात एखादा आजार तर होणार नाहि ना ? याचाहि विचार केला जातो.

४) नोकरी/ व्यवसाय – दोघांच्या पत्रिकेत विषेषतः मुलाच्या पत्रिकेत नोकरी/व्यवसाय कसा असेल ? यात भविष्य काळात काही अडचणी तर येणार नाहित ना ? आशिक/सापत्तिक परिस्थिती कशी राहिल.

अशा सर्व मुद्यांचा सारासार विचार करुण पत्रिका जमवल्यास प्रमाण नाहिसे होऊन विवाह सुखकर होतो.

 


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla