Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
चैत्र गौरीचे हळदीकुंकू
Festivals

चैत्र गौरीचे हळदीकुंकू

chaitra gauriche haladikunkuचैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत गौरीचा उत्सव असतो. या काळात मंगळवार , गुरुवार , शुक्रवार , रविवार या वारांना चैत्रगौरीचे हळदीकुंकू करतात. चैत्र गौरीला सौभाग्यासाठी दान मागतात. गौरीची आरास मांडतात . या दिवशी न्हाल्यानंतर गौरीचा पाळणा स्वच्छ करून देवात असलेली गौर घेऊन तिला स्नान घालून पुसून पाळण्यात ठेवतात. गौरीची पूजा करतात. पाळण्याजवळ गौरीसाठी पाणी भरलेले भांडे ठेवतात. गौरीला खण किंवा कापड घालून साखरेची गाठी घालतात.

आरास मांडताना चारी बाजूने आंब्याचे डहाळे लावतात. एका ताटात हळदीकुंकू , आंब्याच्या डाळीची खिरापत, ओटी ,बत्तासे , फळे ठेवतात. आरास मांडताना गौरीपुढे शेते मांडायची असतील तर हळदीकुंकू करण्याच्या आठ दिवस आधीच लहान सुगडात गहू पेरावेत. आयत्या वेळी सुगड स्वच्छ् करून त्यावर नक्षीकाम करावे व सजवून ठेवावे. धान्याने भरलेल्या मापावर कुंची घालून हे बाळ गौरीपुढे ठेवावे. कुंची नसेल तर झबले टोपडे घालून माप ठेवावे. या दिवशी सुवासिनीला जेवायला बोलवावे. पुरणाचे जेवण घालावे.
गौरीपुढे ठेवण्यासाठी लाडू, करंज्या ,चकल्या ,शेव ,चिवडा, अनारसे, शंकरपाळ्या असे फराळाचे पदार्थ करावेत. चैत्र गौरीच्या हळदीकुंकासाठी आलेल्या बायकांना साखरेची खिरापत देऊन भिजवलेल्या हरभरयानी ओटी भारतात. हळदी कुंकवाला येणाऱ्या बायकांना आंब्याची डाळ, हरभऱ्याची उसळ व पन्हे देतात. गौरीला गव्हाल्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात. अक्षयतृतीयेपर्यंत गौर उठवू नये.

 


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla