Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
बाजारातल्या नवीन राख्या
Festivals

बाजारातल्या नवीन राख्या

rakhi2राखीपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर आली असताना बाजार विविधरंगी राख्यांनी सजले आहेत. बाजारात यंदा खडे व मोत्यांच्या कोरीव नक्षीकाम केलेल्या राख्या , ब्रेसलेट, ‌देव राख्या, वुडन राख्या, खड्यांच्या राख्या, घुंगरू राख्या, किड्स राख्या दिसू लागल्या आहेत . या राख्यांचे १०० हून अधिक उपप्रकार ही उपलब्ध आहेत. पुर्वीच्या साध्या गोडंयाच्या रेशमी राख्यांची जागा वैविधपुर्ण राख्यांनी घेतली आहे.२ रुपयापासून ते ६० रुपायांपर्यत या राख्या उपलब्ध आहेत. गेली काही वर्ष चांदीच्या राख्यांनाही चांगली मागणी येत आहे . छोटय़ांसाठी आकर्षक कार्टूनच्या राख्या तर आहेतच. त्यात मिकी, डोनाल्ड, टॉम, जेरीपासून अस्सल देसी - छोटा भीम आणि बालहनुमानही पाहायला मिळतील.२० रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला काय द्याल ?

दागिने हे कोणत्याही स्त्रीचे सगळ्यात आवडते गिफ्ट असते. सोन्याचे दागिने हे तर उत्तम गिफ्ट आहेच पण जरा बजेट चा प्रश्न असेल तर सध्या वेगवेगळ्या मॉल्समध्ये ब्रँडेड ज्वेलरीवर डिस्काऊंट सुरू आहे. त्याचा फायदा घेऊन बहिणीला खूष करून टाकता येईल. कॉस्च्युम ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी ही सध्याची लेटेस्ट इन थिंग आहे आणि ती पारंपरिकोगिन्यांपेक्षा खिशाला परवडणारी आहे हे नक्कीच !


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla