Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
नागपंचमी...
Festivals

नागपंचमी...

1281785412213-nag-panchami-festivalश्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल “आदर” व “पूज्य” भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लाची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो या सणात या वनस्पतीला महत्वाचे स्थान असते. नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवद्य दाखवला जातो. या सणाल विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गुळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते. ‘भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. या विषयीची कथा खालीलप्रमाणे..
नागपंचमी साठी वेदकालापासून अनेक प्रथा आहे. त्यांपैकी एक कथा..सत्येश्वपरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्व र हा तिचा भाऊ होता. सत्येश्वीराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्ववरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्ववरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते..
तसेच दुसरी कथा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले.. तेव्हापासुन नागपंचमीची प्रथा सुरु झाली असेही मानले जाते. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. तसेच नववधू माहेरी येतात. झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सन आनंदाने साजरा करतात. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात
तुम्ही हि आनंदाने हा सण साजरा करा. मुंबई-पुणे ऑनलाईन.कॉम या संकेतस्थळाच्या वाचकांना आमच्या संपूर्ण टीम तर्फे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा....

-संकलीत


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla