विदर्भ वडापाव पार्लेकरांसाठी एक चटकदार , खमंग , आनंदी अनुभव !
Food Articles

विदर्भ वडापाव पार्लेकरांसाठी एक चटकदार , खमंग , आनंदी अनुभव !
महाराष्ट्राची चटकदार संस्कृती आता पार्ल्यात !

vidarbh vadapav collageपार्ले म्हणजे खव्वयांची खाण म्हणतात ते काही चुकीचे नाही. आपल्या पार्ल्याने प्रत्येक प्रांतातले वैशिष्ट्य , वेगळेपण आपल्यात सामावून घेतलय. मग ते दक्षिणेकडील डोसा असो की उत्तरेकडील सामोसा कचोरी की पुण्याची मिसळ ,थालीपीठ ,साबुदाणा खिचडी या सगळ्यांचं वेगळेपण तेवढ्याच प्रेमाने वैशिष्ट्य म्हणून जपलय. सगळीकडचे चांगले उत्तम घेऊन त्यात आपली भर घालून एक रुचकर अन वेगळी स्वत:ची खाद्यसंस्कृती तयार करण्याचं काम करायला इथल्या चोखंदळ पार्लेकरांनी खूप पूर्वीपासूनच सुरुवात केलीय.
या खाद्यसंस्कृतीत जून २०१५ मध्ये अजून एक महत्वाचा आणि पार्लेकरांच्या आवडीचा पदार्थ सामील झाला आपल्या विदर्भाच्या खास शैलीत तो म्हणजे विदर्भ वडापाव !!जर तुम्हाला अस्सल विदर्भाच्या चवीचे चटकदार , झणझणीत खायची इच्छा झाली असेल तर पार्ल्यात राममंदिर रोडवर टिळक मंदिराच्या जरा पुढे असणाऱ्या विदर्भ वडापाव च्या दुकानाला नक्कीच भेट द्यायला हवी. गरमागरम बटाटेवडे , भाजी , सामोसे , डाळवडे , चटकदार मिसळ , आणि खास म्हणजे शेगावची कचोरी सगळे पदार्थ शुद्ध शेंगदाणा तेलात तळलेले. नुसते बघूनच तोंडाला पाणी सुटते.

IMG-20161205-WA0014अल्पावधीतच विदर्भाच्या पदार्थानी अस्सल खवय्यांना भुरळ घातली आहे. शुद्ध शेंगदाणा तेलात बनवण्यात येत असलेल्या रुचकर पदार्थांची चव पार्लेकरांच्या जिभेवर रेंगाळत असल्याने विदर्भाची खाद्यसंस्कृती चवी -चवीने चर्चिली जात आहे. दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करता वडिलांकडून मिळालेला खाद्यसंस्कृतीचा वसा विदर्भ वडापावचे मालक श्री. सुनील वाघ यांनी मोठ्या जिद्दीने यशस्वीरीत्या चालवला आहे.
१८ जून २०१५ मध्ये त्यांनी आपल्या आई वडिलांच्या हस्ते या छोटेखानी हॉटेलचे उदघाटन केले. १९७२ पासून सुनील यांचे वडील रमेश वाघ यांनी अंधेरी स्थानकाबाहेर विदर्भ वडापाव नावाने खाद्यपदार्थांची गाडी सुरु केली होती. त्यांनीही दर्जाशी तडजोड न करता ग्राहकांना उत्तम पदार्थ खाऊ घातले. अल्पावधीतच विदर्भची ख्याती पसरली. सुनील यांनी शाळा शिकता शिकता सर्व पदार्थ बनवण्याची कला वडिलांकडून जोपासली.
गरमागरम वडापाव , बटाटा भजी, खमंग कांदाभजी , मुगडाळ भजी, पंजाबी सामोसा , भरलेली सिमला मिरची आदी पदार्थ खाताच मन तृप्त होऊन जाते. शेगावची फेमस कचोरी व चमचमीत मिसळ पाव खाण्यासाठी दूरवरून खवय्ये विदर्भात गर्दी करत आहेत. सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत मिसळ पावची लज्जत चाखायला मिळते. स्पेशल तर्री सामोसा व अस्सल वैदर्भीय पद्धतीने बनवण्यात आलेल्या चार प्रकारच्या चटण्या पदार्थाची लज्जत वाढवतात. सकाळी ८ ते  रात्री ९ पर्यंत विदर्भ खवय्यांसाठी सुरु असते.
FB Page : vidarbhavadapav@facebook

 

विदर्भवडापाव कडून पार्लेकरांसाठी खास नाताळ भेट .
जेष्ठ नागरिकांसाठी दिनांक ३१ डिसेंबर २०१६ व १ जानेवारी २०१७ ला वडापाव फक्त १० रुपयांना उपलब्ध. !!!

(ऑफर पार्सल साठी उपलब्ध नाही. )

QPAGE-COL widarbh oct15

 

 


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla