Food Articles and Recipes in English and Marathi for parlekars
Refreshing Summer Drinks
Food Articles

Refreshing Summer Drinks

Beat the heat with these cool summer drink recipes. With creative twists on classic lemonade and blended margaritas, we've chosen a collection of refreshing drink recipes such as Lemonade,Minted Iced tea,Strawberry coconut cream soda and Pina Colada Smoothie and many more.. for you to try this season.

Lemonade

lemonade

Ingredients

3 cups cold water
1 cup lemon juice
3/4 cup sugar
Ice cubes
Lemon slices

Read more...
 
उन्हाळ्यात करा झटपट लोणची
Food Articles

उन्हाळ्यात करा झटपट लोणची 

pickle1लोणच्याचं नाव घेतल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं.भारतीय आहारामध्ये लोणच्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोणची जेवणाची स्वादिष्टता वाढवितात. लोणच्याची मागणी देश तसेच विदेशांतही आहे. बाजारात आंब्याची विविध प्रकारची लोणची उपलब्ध आहेत, तसेच मिश्र लोणच्यांमध्येही आंबा वापरला जातो; परंतु भारतात मुख्यतः तेलयुक्त लोणची मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत. लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं आणि अजूनही लोणच्याचे प्रकार आहेत. यातलेच काही प्रकार तुमच्यासाठी खास…

Read more...
 
उन्हाळ्यातील खवय्येगिरी
Food Articles

उन्हाळ्यातील खवय्येगिरी

चैत्र महिना सुरू झाला की आपल्या कडे सुरु होती ती आंबाडाळ, छुंदा आणि पन्हे करण्याची लगबग तसे हे पदार्थ आपल्याकडे करण्याची प्रथा आहे. या वेळेला हिरव्यागार कैऱ्या यायला लागतात आणि एप्रिल, मे चा कडक उन्हाळा पन्ह्यामुळे जाणवत नाही. यावेळेस हे पदार्थ कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत...

ambedalआंबाडाळ

साहित्य - चणाडाळ- १ वाटी, कैरीचा कीस- अर्धी वाटी, हिरवी मिरची-१, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार साखर – मीठ, फोडणीसाठी तेल-३-४ टी स्पून, मोहरी- १ चमचा, हिंग-१ चमचा, हळद- १ चमचा
ओले खोबरे सजावटीसाठी (पाहिजे असल्यास)

कृती - डाळ बुडेल एवढ्या पाण्यात २-३ तास भिजवावी. भिजलेली डाळ,हिरवी मिरची,मीठ,साखर मिक्सर मधे वाटावी. (फार बारीक वाटू नये तसेच जास्त पाणी घालू नये.) त्यात कैरीचा कीस घालावा आणि नीट एकत्र करावे. तेल तापवून मोहरी, हिंग घालून खमंग फोडणी करावी. थोडी गार झाल्यावर त्यात हळद घालावी. ही फोडणी डाळीच्या मिश्रणात ओतावी आणि सर्व नीट एकत्र करावे. वरून चिरलेली कोथिंबीर घालावी. आवडत असल्यास खोबरे घालावे. थंड झाल्यावर खावी.
ही आबांडाळ चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी काही ठिकाणी खास करण्यात येते.
ही आबांडाळ दोन तीन दिवसच टिकते त्यामुळे ही लवकरात लवकर संपवावी.


chhunda-1छुंदा

साहित्य : खोबरी जातीच्या कैर्‍या, हळद, मीठ चवीनुसार, लाल तिखट, साखर किंवा गूळ, जिरे.

Read more...
 
हरभऱ्याची उसळ
Food Articles

हरभऱ्याची उसळ

harbharyachi usalसाहित्य :
३ वाट्या मोड आलेले हरभरे , पाव वाटी खवलेला नारळ, १०-१२ पाकळ्या लसूण, आल्याचा लहान तुकडा, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ,१ चमचा बारीक चिरलेला गुळ , मीठ ,२ मोठे चमचे तेल.
मसाला : १ चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, २ चमचे तिखट, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद.

Read more...
 
होळी रे होळी पुरणाची पोळी
Food Articles

होळी रे होळी पुरणाची पोळी

पुरण पोळी

puranpoli.jpg

साहित्य : २ वाट्या चण्याची डाळ, १ वाटी गुळ, १ वाटी साखर, ६-७ वेलदोड्यांची पूड ,चिमुटभर जायफळ पूड, चिमुटभर हळद, २ चमचे तेल , अर्धा चमचा मीठ .

कृती :   डाळ धुवून त्यात ३ वाट्या पाणी, तेल हळद व मीठ घालून डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी. डाळ शिजल्यावर ती चाळणीत टाकावी आणि पाणी निथळू द्यावे. गुळ किसून घ्यावा किंवा बारीक चिरावा.पातेल्यात डाळ गुळ व साखर एकत्र करावे पातेले गेस वर ठेवावे. गुळ वितळायला लागला की गेस बारीक करावा.मंदाग्नीवर पुरण शिजवावे. हे मिश्रण हलवत राहावे. उलथने पुराणात उभे केले असता सरळ उभे राहिले की पुरण शिजले असे समजावे. मिश्रण चांगले घट्ट झाले की पातेले उतरवून ठेवावे. त्यात वेलची पूड व जायफळ पूड घालावी. व पुरण गरम असतानाच पुरण यंत्रातून काढावे किंवा पाट्यावर वाटावे म्हणजे ते लवकर व बारीक वाटले जाते.

Read more...
 
गुळाची पोळी ,तिळगुळाचे लाडू ,चुरमुरयाचे लाडू
Food Articles

"तिळगुळ घ्या गोड गोड बोला" 

गुळाची पोळी ,तिळगुळाचे लाडू

sankrant tilgulमस्त थंडी पडलीय आणि अशा थंडीत स्निग्ध पदार्थ खावेत असे आरोग्यशास्त्र सांगते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत या महिन्यामध्ये तीळाचे पदार्थ खावेत असे सांगितले आहे.त्यातच थंडीत मकरसंक्रांत सण येत असल्याने या लाडवाला भारी मागणी असते सगळ्यात जास्त कॅल्शियम तिळात असते तिळात ई-जीवनसत्त्व असते यात जास्त फॅट्स असल्याने वजन वाढवण्याची इच्छा असणार्‍या व्यक्तींनी हे लाडू या दिवसांत आवर्जून खावेत तिळातील ऑलेथिक ऍसिड वाईट कॉलेस्टेरॉल कमी करून चांगले कॉलेस्टेरॉल वाढवते शरीराला बाधणारे घटक तीळ कमी करतो त्यामुळे या हिवाळ्यात बिनधास्त तिळाच्या लाडवांवर ताव माऱा.

Read more...
 
विदर्भ वडापाव पार्लेकरांसाठी एक चटकदार , खमंग , आनंदी अनुभव !
Food Articles

विदर्भ वडापाव पार्लेकरांसाठी एक चटकदार , खमंग , आनंदी अनुभव !
महाराष्ट्राची चटकदार संस्कृती आता पार्ल्यात !

vidarbh vadapav collageपार्ले म्हणजे खव्वयांची खाण म्हणतात ते काही चुकीचे नाही. आपल्या पार्ल्याने प्रत्येक प्रांतातले वैशिष्ट्य , वेगळेपण आपल्यात सामावून घेतलय. मग ते दक्षिणेकडील डोसा असो की उत्तरेकडील सामोसा कचोरी की पुण्याची मिसळ ,थालीपीठ ,साबुदाणा खिचडी या सगळ्यांचं वेगळेपण तेवढ्याच प्रेमाने वैशिष्ट्य म्हणून जपलय. सगळीकडचे चांगले उत्तम घेऊन त्यात आपली भर घालून एक रुचकर अन वेगळी स्वत:ची खाद्यसंस्कृती तयार करण्याचं काम करायला इथल्या चोखंदळ पार्लेकरांनी खूप पूर्वीपासूनच सुरुवात केलीय.
या खाद्यसंस्कृतीत जून २०१५ मध्ये अजून एक महत्वाचा आणि पार्लेकरांच्या आवडीचा पदार्थ सामील झाला आपल्या विदर्भाच्या खास शैलीत तो म्हणजे विदर्भ वडापाव !!जर तुम्हाला अस्सल विदर्भाच्या चवीचे चटकदार , झणझणीत खायची इच्छा झाली असेल तर पार्ल्यात राममंदिर रोडवर टिळक मंदिराच्या जरा पुढे असणाऱ्या विदर्भ वडापाव च्या दुकानाला नक्कीच भेट द्यायला हवी. गरमागरम बटाटेवडे , भाजी , सामोसे , डाळवडे , चटकदार मिसळ , आणि खास म्हणजे शेगावची कचोरी सगळे पदार्थ शुद्ध शेंगदाणा तेलात तळलेले. नुसते बघूनच तोंडाला पाणी सुटते.

Read more...
 
थंडीसाठी खास - लाडू खा लाडू ….
Food Articles

लाडू खा लाडू ….

नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी... थंडीचे दिवस... उत्तम आरोग्याचे दिवस.. भरपूर व्यायाम करण्याचे आणि भरपूर खाण्याचे दिवस. खरंच या महिन्यांमध्ये खवय्यांची छान चंगळ असते. खूप भूक लागते. पोटभर जेवण जाते. कारण भरपूर खाण्यापिण्याची विविधता असते आणि खाल्लेलं पचायला आणि अंगी लागायला निसर्गाची साथ मिळते.
थंडीच्या दिवसांतील खाता  येणाऱ्या विशेष पदार्थांपैकीच एक सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे लाडू …जो खाल्यान्ने तूप, साखर , ड्राय फ्रुट्स असे स्निग्ध , मधुर आणि पौष्ठिक पदार्थ आपल्या पोटात जातात .  म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत वेगवेगळ्या प्रकारांच्या लाडवांच्या चटकदार रेसिपीज ….

dink ladooडिंकाचे लाडू
साहित्य – चकचकीत स्वच्छ असा वाटाण्यासारखा बारीक डिंक अर्धा किलो,  खारीक पाव किलो, आळीव पाव किलो, खसखस पाव किलो,  सुके खोबरे १ किलो, गूळ, साजूक तूप,  बदामगर, वेलची पूड व जायफळ पूड,
कृती- डिंक तुपात फुलवून घ्यावा. खसखस भाजून घ्यावी. आळीव थोड्या तुपात भाजावा. खारीक भाजून घ्यावी. सुके खोबरे भाजावे. नंतर तळलेला डिंक खलबत्यात थोडासा कुटून घ्यावा. खमंगपणा येण्यासाठी खसखस मिक्सरवर वाटून घ्यावी. खारीकसुध्दा मिक्सरवर जराशी वाटून घ्यावी.(पीठ करू नये) व हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे. त्यात बदामगर, वेलची व जायफळ पूड घालावी व मिश्रण हातानेच बारीक करावे.
लाडू करण्यासाठी पध्दत- लाडू करतेवेळी जेवढे मिश्रण असेल त्याची निम्मे गूळ घेऊन त्याचा गोळीबंद पाक करावा. पाक कोवळा करू नये. साधारण हातात त्याची गोळी करता आली पाहिजे. नंतर पाक खाली उतरून त्यात तयार केलेले सारण ओतावे व चांगले ढवळावे व भराभर लाडू करावेत.

Read more...
 
दिवाळीचा फराळ
Food Articles

दिवाळीचा फराळ

दिवाळी म्हटलं की खरेदी पाठोपाठ पोटपूजाही आलीच. आणि आता दिवाळी आलीच आहे. घराघरातून खमंग वास येऊ लागलेत. दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे.हल्ली गोडधोड डाएटींग मुळे मागेच पडलेय. पण वर्षभर डाएटबिएट करावे आणि दिवाळीत मात्र भरपूर खावे.
म्हणूनच तुमच्यासाठी खास आणल्या आह्रेत दिवाळी च्या खास रेसिपीस …
diwali faralबेसनाचे लाडू:
साहित्य : बेसन २ वाट्या , अर्धी वाटी बारीक रवा , अडीच वाट्या पिठी साखर, वेलची पूड , काजू काप, बदाम काप, मनुका, बेदाणे व साजूक तूप.

Read more...
 
बाप्पाचे आवडते मोदक !
Food Articles

  बाप्पाचे आवडते मोदक !

गणपतीच्या नैवेद्याला मोदक हवेतच. चतुर्थीच्या दिवशी घराघरांतून मोदकांचा दरवळ येतो. तळलेले मोदकही नैवेद्यासाठी केले जातात. गृहिणी आपल्या कौशल्याने वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बाप्पासाठी करतात. खास तुमच्यासाठी मोदकांच्या काही रेसिपीज ...

modak small१. उकडीचे मोदक -
साहित्य : २ वाट्या तांदळाचे पीठ , २ वाट्या गुळ , एका नारळाचे खवलेले खोबरे , पाव वाटी खसखस, २ चमचे तूप , वेलची पूड.
कृती : खवललेले खोबरे व गुळ एकत्र करून शिजवावे. त्यात भाजून घेतलेली खसखस व वेलची पूड घालून घट्ट सारण करून घ्यावे.जितके तांदळाचे पीठ तितकेच पाणी मोजून घेऊन ते पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात किंचीत मीठ व २ चमचे तूप घालावे. उकळी आल्यावर पातेले गॅसवरून खाली उतरवावे. व त्यात तांदळाचे पीठ घालून नीट ढवळून घ्यावे. पुन्हा गॅसवर पातेले ठेऊन २ वाफा आणून घ्याव्यात. पातेले खाली उतरवून उकड गरम असतानाच मळावी . उकडीची लिंबाएवढी गोळी घेऊन तिला हाताने वाटीचा आकार द्यावा.त्यात खोबऱ्याचे सारण भरून कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून तोंड बंद करावे.

Read more...
 
नारळी पौर्णिमेसाठी खास रेसिपीज ….
Food Articles

नारळी पौर्णिमेसाठी खास रेसिपीज ….

naralache-ladooपरस्परांतील प्रेम दृढ व्हावे , नात्यांची विण अधिक घट्ट बसावी म्हणूनच आपण वेगवेगळे सण साजरे करत असतो. रक्षाबंधन हा त्याचाच एक भाग. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दिर्घ आयुष्य आणि उज्जवल भविष्याची कामाना करते. भाऊही आपल्या बहिणाला तिच्या रक्षणासाठी तिच्यामागे खंबीरपणे उभे राहण्याचे वचन देतो. बहिण भावांच्या या अत्यंत महत्वाच्या सणाला आणखी गोड बनवायला आम्ही काही खास मिठायांच्या रेसिपीज इथे दिल्या आहेत. तर मग करूया ना तोंड गोड !

नारळाचे लाडू 

साहित्य : दोन मोठे नारळ, गूळ, वेलची पूड, काजू, बदाम, बेदाणे, थोडेसे साजूक तूप.

कृती : नारळ फोडून खोवून घ्यावा. जेवढ्या वाट्या नारळाचा खव असेल त्याच्या निम्मा बारीक केलेला गूळ घ्यावा. जास्त गोड लाडू हवे असल्यास पाव वाटी अजून गुळ घ्यावा. कढईत एक चमचा तूप टाकून त्यात गूळ घालावा.

Read more...
 
“ खादयसंस्कृती अस्सल पार्लेकरांची ...अस्सल पार्ल्याची”
Food Articles

“ खादयसंस्कृती अस्सल पार्लेकरांची ...अस्सल पार्ल्याची”

poheपु. ल. देशपांडेनी म्हटल्याप्रमाणे. हिरण्यकश्यपूपुढे छाती काढून उभं रहावं असं गोलाकारी मुंबईच्या पोटातून आलेल हे चिमुरडं उपनगर पार्ले !
या पार्ल्याला लाभलेल्या अनेक वरदानांपैकी एक म्हणजे य पार्ल्याचे चोखंदळ खवैय्ये पार्लेकर!
या आपल्या पार्ल्याने प्रत्येक प्रांतातलं वेगळेपण, वैशिष्टय आपल्यात सामावून घेतलयं, दक्षिणेकडला इडली डोसा आणि उत्तरेकडली समोसा कचोरी आपली मानलीयं; पण तरीही पुणेरी मिसळ, खमंग थालीपीठ, साबुदाणा खिचडी यांच वेगळेपण तेवढयाच प्रेमाने आपल वैशिष्टय म्हणून जपलयं.सगळीकडचं चांगल उत्तम ते घेऊन त्यात आपली भर घालून एक रूचकर अन वेगळी अशी स्वत:ची खादयसंस्कृती तयार करण्याचं काम करायला इथल्या चोखंदळ पार्लेकरांनी खूप पूर्वीपासूनच सुरूवात केलीय.अगदी 50 वर्षापूर्वी पावनगडकरांचा विलेरी चिवडा याहून मोठी चैन देणारे पार्ल्यात हाँटेल नव्हते आणि पार्ल्यातल्या अविवाहितांना नामजोशांची खाणावळ हा एकमेव आधार होता.

Read more...
 
Must have food items to enjoy this monsoon & food for rainy season.
Food Articles

Must have food items to enjoy this monsoon & food for rainy season.

FOOD FOR RAINY SEASON:

food for monsoon

CHAI GARAM CHAI GARAM …..

cutting chaiHot tea or Masala tea, Cinnamon Tea any kind of tea in this cold and rainy weather is the best thing one could ever drink. Popularly known as ‘Cutting Chai’ can beat all other drinks this season. No need of any fruit juice or Lassi or milkshake , just one cup of tea and you can feel most comfortable in the monsoon.


BHAJIAS AND PAKODAS
kanda bhajiGarmagaram Kanda, Batata , Mirachi or any pakodas is the most desired food for rainy season in every house.From garma garam besan ka pakoda to bread pakoda to any stuffed pakoda is the tastiest when combined with the ‘Cutting Chai’.

Read more...
 
नारळी पौर्णिमेसाठी खास रेसिपीज ….
Food Articles

नारळी पौर्णिमेसाठी खास रेसिपीज ….

परस्परांतील प्रेम दृढ व्हावे , नात्यांची विण अधिक घट्ट बसावी म्हणूनच आपण वेगवेगळे सण साजरे करत असतो. रक्षाबंधन हा त्याचाच एक भाग. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दिर्घ आयुष्य आणि उज्जवल भविष्याची कामाना करते. भाऊही आपल्या बहिणाला तिच्या रक्षणासाठी तिच्यामागे खंबीरपणे उभे राहण्याचे वचन देतो. बहिण भावांच्या या अत्यंत महत्वाच्या सणाला आणखी गोड बनवायला आम्ही काही खास मिठायांच्या रेसिपीज इथे दिल्या आहेत. तर मग करूया ना तोंड गोड !

naralache-ladooनारळाचे लाडू
साहित्य : दोन मोठे नारळ, गूळ, वेलची पूड, काजू, बदाम, बेदाणे, थोडेसे साजूक तूप.

कृती : नारळ फोडून खोवून घ्यावा. जेवढ्या वाट्या नारळाचा खव असेल त्याच्या निम्मा बारीक केलेला गूळ घ्यावा. जास्त गोड लाडू हवे असल्यास पाव वाटी अजून गुळ घ्यावा. कढईत एक चमचा तूप टाकून त्यात गूळ घालावा. मंद गॅसवर गूळ विरघळू द्यावा. पूर्ण विरघळल्यानंतर त्यात नारळाचा खव आणि काजू-बदामाची पूड, बेदाणे घालावेत. थोडासा घट्टसर गोळा झाला की गॅस बंद करावा; मिश्रण सारखे ढवळत राहावे. लाडू वळण्याइतपत गार झाल्यानंतर मिश्रणाचे लाडू वळावेत. हे लाडू अत्यंत पौष्टिक आणि खायला रुचकर लागतात.

Read more...
 muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla