Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
बजेट २०१५: काय महागले, काय स्वस्त झाले.....
Finance Articles and Updates

बजेट २०१५: काय महागले, काय स्वस्त झाले.....

wealthcreation-pigदेशाचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 2015-16 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प राज्यसभेत सादर केला. मोदी सरकारने प्रथमच संपूर्ण वर्षाचे बजेट सादर केले आहे.भरपूर योजना , सबसिडी इ. नी भरलेले नसून एकदम साधे असे हे बजेट आहे. जेटलींच्या बजेटवर भांडवली बाजाराने निराशा व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. या बजेट नंतर काय महागले आणि काय स्वस्त झाले हे पुढीलप्रमाणे ….

अरुण जेटलींच्या आजच्या बजेटमध्ये सेवाकर 12 टक्क्यांवरून 14 टक्के केल्याने ब-याच वस्तू महाग होणार आहेत.


महाग-
- हॉटेलिंग, लॉजिंग
- इंटरनेट
- मोबाईल बिल
- ऑनलाईन तिकीटे ( रेल्वे, विमान, एसटी) बुक करणे महाग होणार
- सिनेमा तिकीट
- रेडिमेड ब्रॅण्डेड कपडे
- सौंदर्य प्रसाधने
- जिम, योगा वर्ग
- कपडे धुणे व इस्त्री करणे ( ड्रायक्लिनिंग)
- टॅक्सी भाडे
- डॉक्टर, वकील
- तंबाखू
- गुटखा
- पानमसाला
- सिगारेट, सिगार
- हॉस्पीटल खर्च, जाहिराती
- बँकिंग सेवा आणि इतर वित्तीय सेवा
- क्रेडीट आणि डेबिट कार्डवरील व्यवहार
- पॅकेजिंग, पोस्ट व कुरिअर सेवा,
- पर्यटन
- कार, टीव्ही
- संगणक
- पाण्याची बाटली
- पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी व सेस वाढवल्याने इंधन महागणार
प्लॅस्टिक बॅगा व वस्तू महागणार
स्वस्त
- चामड्याच्या वस्तूंच्या करात 6 टक्क्यांनी कपात
- एक हजार रूपयापर्यंतचे बुट स्वस्त होणार. चप्पल, देशी लेदरच्या वस्तू स्वस्त होणार
- सौर ऊर्जावरील उपकरणे
- लोखंड, स्टील स्वस्त होणार
- एलईडी टीव्ही स्वस्त होणार
- बॅटरीवरील दुचाकी स्वस्त होणार
- मायक्रोवेव ओव्हन स्वस्त होणार
- सीसीटीव्ही कॅमेरे स्वस्त होणार
- खते स्वस्त होणार
- मोबाईन फोन, टॅबलेट स्वस्त होणार
- अॅम्बुलन्स गाडी बनविणे स्वस्त होणार.

 


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla