Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
मुंबईत फटाके कुठे खरेदी कराल?
Finance Articles and Updates

मुंबईत फटाके कुठे खरेदी कराल?

fatake1आपण कितीही म्हटलं की या दिवाळीत आम्ही फटाके वाजवणार नाही तरी दिवाळी आली की फटाक्यांची आठवण होतेच. आणि मग आपण शोध घ्यायला लागतो , या वेळचे बाजारात आलेले नवीन फटाके कोणते आहेत , ते कुठे मिळतील इ. म्हणूनच तुमच्यासाठी इथे खास देत आहोत मुंबईतील प्रसिद्ध फटाक्यांची दुकाने ..

यंदा फटाक्यांच्या पारंपारिक फुल्भाज्या , अनार , भुइचक्र , लवंगी या बरोबरच नवीन प्रकार बाजारात दिसत आहेत ते म्हणजे म्युझिकल क्रॅकर्स,कलरफुल फुलबाज्या,उंच जाणारे डबल शॉट, २५ शॉट्स, रॉकेट्स असे फटाके . यातही स्टँडर्ड, बाबा स्पार्कल्स, कॉक, वोल्कॅनो, आझाद या कंपन्यांच्या फटाक्यांना जास्त मागणी आहे. या फटाक्यांची किंमतही तुम्ही घ्याल त्याप्रमाणे असून अगदी दहा रुपयांपासून ते दहा हजारापर्यंतचे फटाके बाजारात मिळतात.हे फटाके तामिळनाडू राज्यातील शिवकाशी येथून. तिथे फटाक्यांची मोठया प्रमाणावर निर्मिती होते.
मुंबईत फटाके घेण्यासाठीचे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे महंमद अली रोडवरच्या इसाभाईंचे दुकान आणि त्याच रांगेत असलेली चार-पाच दुकाने. दिवाळीच्या साधारण पंधरा दिवस आधीपासूनच या रस्त्यावर गर्दी जमायला सुरुवात होते. या चार-पाच दुकानांमधलं ‘इसाभाई’ हे दुकान तसं खूप प्रसिद्ध आहे. ईसाभाई या नावाने हे दुकान १९३८ मध्ये इथे सुरू आहे. सध्या ईसाभाईंची चौथी पिढी कार्यरत आहे. त्यांच्या दुकानांना लागूनच आणखी चार-पाच दुकानं उभी आहेत. त्यात फटाक्यातल्या बंदुकांपासून ते भुईचक्र, पाउस, लवंगा, ताजमहाल, लक्ष्मीबार, अ‍ॅटम बॉम्ब, उंच उडणारे डबल शॉट, २५ शॉट्स, रॉकेट्सपर्यंत सगळ्या प्रकारचे फटाके या ठिकाणी मिळतात. त्यामुळे ऑफिसला जाताना वा ऑफिसमधून घरी येताना फटाके घेण्यासाठी लोकांची झुंबड उडते. सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत या दुकानांच्या बाहेर गि-हाईकांची कायम गर्दी दिसते. दिवाळी जवळ येऊ लागते तशी ही गर्दी वाढतच जाते.
हि दुकाने तर आहेतच पण दिवाळीच्या काळात फटाक्यांचे स्टॉल्स ठिकठिकाणी उभे राहतात. अगदी एका गल्लीत दोन -दोन, तीन- तीन फटाक्यांची दुकाने बघायला मिळतात.


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla