उन्हाळ्यात तजेलदार त्वचेसाठी
Fashion Articles

उन्हाळ्यात तजेलदार त्वचेसाठी

skin-care-in-summerवाढत्या उन्हाबरोबरच त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. अॅक्नेची समस्या तर अत्यंत सामान्य आहे. उन्हाळ्यात येणारे पिंपल्स सहजासहजी जात नाही. सौंदर्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा असतो तो त्वचेचा. त्वचा चांगली असल्यास चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसतो. उन्हामुळे त्वचेला हानी पोहोचण्याची शक्‍यता असते. मग डोळ्याखली काळी वर्तुळे उठणे त्वचेवर पुरळ उठणे असे प्रकार होऊ शकतात.

तसेच चेहरा काळवंडणे अशा गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो. मग पुन्हा एकदा चेहरा चांगला करण्यासाठी पार्लरचा अवलंब केला जातो. परंतु त्यापेक्षा घरगुती काही ट्रीक्‍स वापरल्यास निश्‍चितच आपली त्वचा काळवंडण्यापासून, सुरकुत्यांपासून आपण वाचवू शकतो आणि चेहरा तजेलदार ठेवण्यास मदत करू शकतो.म्हणूनच आम्ही तुम्हाला घरच्या घरी चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी व गोरा रंग येण्यासाठी काही घरगुती उपाय येथे देत आहोत. यासाठी, अगदी सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टींचा म्हणजेच बेकिंग सोडा, पिकलेली केळी, आंब्याच्या साली यांचा वापर तुम्ही करू शकता आणि घरच्या घरीच चेहऱ्याची तकाकी पुन्हा मिळवू शकता.

 

उन्हाळ्यात तजेलदार त्वचेसाठी काही घरगुती उपाय :

१. बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घ्या. चेहरा स्वच्छ धुवून ती पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटे लावा. फरक तुम्हाला दिसेल.

२. पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण चेहऱ्यावर लावून २०-२५ मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.

३. त्वचा उजळण्यासाठी गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावावे.

४. अॅलोव्हेरा जेलचा म्हणजेच कोरफडीचा वापर केल्याने चेहरा गोरा, स्वच्छ आणि ओलसर राहील. किमान अर्धा तास जेल चेहऱ्यावर लावावे.

५ . आंब्याच्या साली बारीक करून दुधात मिक्स करून पेस्ट तयार करावी. ती पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावावी. त्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली त्वचा उजळेल आणि चेहरा साफ होईल.

६. साखरेला लिंबाच्या रसात मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब करावं. त्याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल.

७. नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होण्यास मदत होईल.

८. पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवून त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्की उजळतो.


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla