या नवरात्रीत पार्ल्यात काय आणि कुठे खरेदी कराल ? नवरात्र २०१६ फॅशन ट्रेंड्स
Fashion Articles

या नवरात्रीत पार्ल्यात काय आणि  कुठे खरेदी कराल ?  नवरात्र २०१६ फॅशन ट्रेंड्स

dancing-1रंगीलो मारो घागरो.... असो किंवा कुकडा तारा ढोल... असो सळसळत्या उत्साहात गाण्यांच्या तालावर नाचत , गरबा, दांडिया खेळत नवरात्रीचे नऊ दिवस उत्साहाला उधाण आलेले असते. नऊ दिवस रंगांची उधळण असते. मग ते रंग रंगी बेरंगी घागरा चोळी चे असोत वा त्यावर घालणाऱ्या दागिन्यांचे ! हे सगळे आपल्या जीवनातही रंग भरतात. यावर्षीही बाजारात आलेल्या नवीन ड्रेसेस व दागिन्यांचे ट्रेंड खास तुमच्या साठी.

नवरात्रीत खेळला जाणारा गरबा दांडिया हे गुजरातचे नृत्यप्रकार असले तरीही ते महाराष्ट्रातही तितकेच लोकप्रिय आहेत.या दिवसांमध्ये दांडिया खेळायला जाताना ९ दिवस रोज नवीन साज शृंगार करावा म्हणून खूप आधीपासूनच तरुणाईची तयारी सुरु होते.

तरुणाईच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी बाजारपेठाही सज्ज होतात.पण महागडे कपडे व दागिने घेण्यापेक्षा आपल्या आवाक्यात बसतील असे काही सुंदर मिळते का अशी शोधाशोध सुरु होते. यासाठीच यंदाच्या नवरात्रोत्सवाचा ट्रेंड जाणून घेऊया ......

 

नवरात्र म्हटले कि वर्क केलेले वेगवेगळ्या डिझाइन्सचे घागरा चोळी बाजारात बघायला मिळतात.त्याप्रमाणे या वर्षीही वर्क्सच्या ड्रेसेसची फॅशन आहे.बाजारातरास गरबा व अन्य आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. सुंदर नक्षीकाम केलेले आकर्षक घागरा-चोळी, साडय़ा आणि कवडय़ा, मण्यांचा वापर करून तयार केलेले दागिने आदींनी बाजार फुलला आहे. दांडियानिमित्त विलेपार्ले मार्केट , दीनानाथ ,खोखा  मार्केट पार्ले वेस्ट अशा सर्वच ठिकाणी नवरात्रीचा बाजार सजला असून नवरात्रीसाठी खास तयार केलेले बांधणीचे कपडे, राजस्थान, मेवाड, बडोदा, सुरत, येथून मागवून विकण्यास ठेवले आहेत.
दांडिया खेळण्यासाठीच्या विशेष घागऱ्याला मोठी मागणी असून सुंदर नक्षीकाम असलेले घागरे, साडया, चनिया-चोळी, धोती, कुर्त्यांकडे तरुणाईचा अधिक कल आहे. या कपडय़ांच्या किमती किमान ८०० रुपये आहेत. या वर्षी घागरा चोळी कॉटन, शिफोन, आणि पारंपारिक बांधणीच्या कपड्यांमध्ये मिळते आहे. तर पुरुषांमध्ये केडिया , धोती , पटियाला असे प्रकार दिसत आहेत.

बाजारातील दुकानांत तर या गोष्टी उपलब्ध आहेतच पण या वर्षीचे काही विशेष ट्रेंड्स असलेले घागरा चोळी पार्ल्यातील ईशीज क्रिएशन्स ( शिल्पा कुलकर्णी ) यांच्याकडेही उपलब्ध आहेत. अगदी ट्रेडिशनल आणि एथनिक घागरा चोळी बरोबरच सणावारांना ही घालता येतील असे पोशाख ही येथे उपलब्ध आहेत. यांची किंमत साधारण १५००/- पासून सुरु होते. यांचे वैशिट्य असे कि हे कपडे एकदा नवरात्रीत घातले कि ठेऊन द्यायची गरज नाही. ते अशा प्रकारे तयार केले आहेत कि तुम्ही ते सणावारांनाही वापरू शकाल.
अधिक माहिती साठी संपर्क : शिल्पा : ९८२०२९२०३७

parle marketया वर्षीच्या खास ऍक्सेसरीजही बाजारात आल्या आहेत. पार्ल्यातील मार्केट मधील दुकानांत यांची किंमत साधारणत: १०० रु. पासून सुरु होते. सिल्क , सुती अशा कपड्यांमध्ये हि विविध नक्षीकाम केलेले ऑक्सिडाइजचे दागिने , सिल्वर प्लेटेड दागिने , व्हाईट , मल्टी कलर चुडा सध्या बाजारात भरपूर प्रकारात उपलब्ध आहेत.

जर तुम्हाला घागरा चोळी असा पारंपारिक ड्रेस घालायचा नसेल तर सरळ जीन्स घाला पण त्याच्यावरती वर्क केलेला बांधणीचा किंवा डिझाइनर कुर्ता घाला आणि ओढणी घ्या. त्याच्यावर दागिने म्हणून ऑक्सिडाइजच्या माळा, झुमके , मांग टीका आणि हातात व्हाईट चुडा घाला बघा कसा ट्रेंडी लुक येईल तो. शिवाय खेळायलाही कम्फर्टेबल वाटेल.

तुमच्या दंडियाना द्या युनिक लूक …

तुम्हाला बाजारात घुंगरू किंवा गोंडे लावलेल्या दांडिया दिसत असतील पण आजकाल लटकनची जास्त फॅशन आली आहे त्यामुळे तुम्ही लटकन लावून तुमच्या दांडिया इन फॅशन करू शकता. तुमच्या प्लेन दांडियांना तुम्ही रंगीत लेस किंवा जाड गोल्डन किंवा सिल्व्हर दोरे लावून त्यांना थोडा टिपिकल लुक देऊ शकता. लाकडाच्या दांडियांना पेपर, लेस किंवा गोंडे चिटकवताना शक्यतो फॅब्रिक ग्लूचा वापर करा. तसेच यावर फुलांची एखादी नक्षी काढू शकता किंवा जास्त रंगांचा वापर करून बारीक नक्षीकाम केला तरी तुमच्या दांडिया आकर्षक दिसू शकतील.

या साऱ्या वस्तूंची खरेदी करण्यातला आनंद काही औरच !पण एक महत्वाची टीप: हि खरेदी करताना भरपूर घासाघीस  करायला विसरू नका.

 


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla