सुबक , सुंदर शाडू मातीच्या गणेश मूर्ती - पार्लेकरांची पसंती
Fashion Articles

सुबक , सुंदर शाडू मातीच्या गणेश मूर्ती - पार्लेकरांची पसंती

IMG-20160725-WA0004पार्लेकर पहिल्यापासूनच सुसंस्कृत, पर्यावरण प्रेमी म्हणून गणले जातात. गणपतीत तर त्याची प्रचीती पुरेपूर येते. टिळक मंदिरातल्या गणपतीत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम , लेझीम आणि ताश्यांसह होणारी मिरवणूक , पार्ल्यातील अनेक सार्वजनिक मंडळे वापरात असलेले इको फ्रेंडली गणपतीचे ऑपशन्स म्हणजे श्रद्धानंद रोडचा टिशू पेपरचा गणपती इ. नेहमीक पर्यावरणाची काळजी घेणारे पार्लेकरांचे दर्शन घडवतात . त्यात पार्ल्यातील घरच्या गणपतीचेही हेच आहे.
आज पार्ल्यातील बहुतांश घरात शाडूच्या गणपती मूर्तींची विशेष मागणी आहे. आपल्या साठी खास आम्ही देत आहोत पार्ल्यातील गणेश मूर्ती मिळण्याची ठिकाणे आणि त्या त्या ठिकाणांचे खास वैशिष्टय..
गणपती मूर्ती शॉप : श्री वाजय वडोदरीया
श्री अजय वडोदरीया यांचे पार्लेश्वर मंदिरासमोर असलेले गणपती मूर्ती शॉप गेल्या अनेक वर्षांपासून पार्लेकरांना मनपसंत सुबक व सुंदर मूर्ती उपलब्ध करून देत आहे. गेल्या २ -३ वर्षांपासून पार्ल्यात इको फ्रेंडली मूर्तींची मागणी वाढत आहे म्हणूनच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी श्री अजय वडोदरियांनी देखील १०० % शाडू मातीच्याच मूर्ती आपल्या दुकानात खरेदीसाठी ठेवल्या आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या कडे येणारे ग्राहक हे अत्यंत खुश असतात. श्री अजय यांच्या दुकानातील गणपती मूर्ती आपल्या घरात आणल्यामुळे त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जाते असे त्यांचे ग्राहक त्यांना सांगत असतात.

 

IMG-20160725-WA0006त्यांची खासियत म्हणजे फक्त गणपती मूर्तींची विक्री करणे एवढेच काम न करता ते सर्वाना गणपती घरी नेताना कशा प्रकारे घेऊन जावा , त्याची पूजा कशी करावी इ . ते आपलेपणाने सांगतात. दरवर्षी बाजारात गणपतींच्या पारंपरिक मूर्तींबरोबर विविध प्रसिद्ध व्यक्तिरेखा असणाऱ्या गणपतीच्या मूर्तींनाही भरपूर मागणी असते. मागील वर्षी प्रमाणे या वर्षीही जय मल्हार मधील खंडोबाच्या स्वरूपाच्या गणेश मूर्तीला भरपूर मागणी आहे तसेच यंदा बाजीराव यांच्या स्वरूपातील गणेश मूर्ती ही मागणीत आहेत. श्री अजय यांच्या मूर्ती शॉप मध्ये गुजराती , मराठी आणि साऊथ इंडियन असे अनेक पार्लेकर ग्राहक म्हणून अनेक वर्षांपासून येतात.

पार्ल्यात हनुमान रोड वर असणारे दिलीप मोडक यांचे गणपती मूर्तींचे दुकानही आकर्षक मूर्तींनी सजले आहे. त्यांच्याकडेही शाडूच्या मूर्ती उपलब्ध आहेत तसेच पीओपी च्या मूर्तीही मिळतील. लोकमान्य सेवा संघातील गणेशोत्सवाची मूर्ती श्री मोडक यांच्याच दुकानातील असते.

पार्ल्यातील नेहरू रोड वर असणारे आकृती आर्टस् येथेही विविध आकर्षक मूर्ती पाहावयास मिळतील. प्रत्येक मूर्तीची वेगळी खासियत त्याप्रमाणे दरवर्षी हे वेगवेगळ्या मूर्तींची निर्मिती करतात. मागील वर्षी मोत्यानी सजवलेले गणपती बनविले होते या वर्षी छोट्या हिऱ्यांसारख्या खड्यांनी सजवलेले गणपती पाहायला मिळतील.

पार्ल्यात मार्केट मध्ये असणाऱ्या सौ. कमला साठे गणेश मूर्ती केंद्रातून गेली अनेक वर्षे पार्लेकर श्रींची मूर्ती घेऊन जात आहेत. त्यांच्याकडे गणपतीच्या पारंपरिक मूर्ती , बाजारात या वर्षी प्रचलित असणाऱ्या गणेश मूर्ती , नागाच्या मूर्ती, श्रीकृष्णाच्या मूर्ती, हरितालिका जोड, गौरी मुखवटे, गौरीच्या बॉडी , गौरीच्या नऊवारी तसेच पाचवारी साड्या तसेच गौरीचे अलंकारही मिळतील.

पार्ल्यात हनुमान रोड वर श्री गणेश आर्ट यांच्याकडेही श्री. गुरव यांनी स्वत: बनवलेल्या शाडू मातीच्या मूर्ती मिळतील.
या वर्षी बाजारात जास्त करून गुलाबी, चंदन, आणि हिरवा या तीन रंगांचा मूर्तीच्या रंगकाम उपयोग करण्यात आला आहे. चंदनाचा रंग शांतता दर्शवतो, हिरवा रंग इको फ्रेंडली आहे आणि गुलाबी रंगाची लज्जत वेगळीच वाटते. तसेच, हिरे , मोती , रंगेबीरंगी खडे यांनी सजवलेल्या मूर्ती मन प्रसन्न करतात.


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla