Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
मोआना ऍनिमेशन मुव्ही रिव्ह्यू ...
Entertainment Articles

मोआना डिझनीची लहान मुलांबरोबर मोठ्यांनाही मंत्रमुग्ध करणारी नवीन प्रिन्सेस !!

moana-movie-2016मोआनाची गोष्ट सुरु होते पॉलिनेशिया मधल्या मोटुणूई या आयलँडमधून . ती तिथल्या प्रमुखाची मुलगी. त्यांचे आयलंड स्वयंपूर्ण असते. तिथे सर्व काही उपलब्ध असल्याने इतर कुठे जायची गरजच पडत नाही. पण मोआनाला मात्र समुद्राची, क्षितीजाच्या पलीकडे काय आहे ते शोधण्याची लहानपणापासूनच ओढ असते. त्यामुळे तिची पावले सतत समुद्राच्या दिशेने वळत असतात. पण तिचे वडील या बाबतीत खूप कडक असतात. आपल्या आयलंड मध्ये आपल्यासाठी सर्वकाही आहे या रिफच्या बाहेर जायची अजिबात गरज नाही आणि कधी जाऊही नको असे म्हणून ते नेहमी तिला थांबवतात. मोआनाची आजी मात्र मोआनाला त्यांच्या पूर्वजांच्या गोष्टी सांगून या आयलँडच्या बाहेर पाडण्यासाठी प्रवृत्त करत असते. तिला ती नेहमी म्हणते की सर्व काही सर्वांचे ऐकावे पण आपल्या अंतर्मनातील आवाज सगळ्यात आधी ऐकावा आणि तसेच करावे. मोआनाची समुद्रापार जायची ओढ तिला माहित असते म्हणून एक दिवस ती तिला एका गुप्त जागी घेऊन जाते

moana as a kidआणि तिथेच मोआनाला कळते कि त्यांचे पूर्वज खलाशी होते. सात समुद्रापार फिरून नवीन ठिकाणे शोधत आणि खूप आनंदात या समुद्राच्या लाटांवर स्वर होत. जे मोआनाला नेहमी करावे असे वाटत असे. ते सत्य दाखवल्यावर तिची आजी तिला सांगते की समुद्रदेवतेने तिला एका खास कामासाठी निवडले आहे. पूर्वी समुद्रात टिफिटी नावाची देवता होती तिनेच हे सुंदर विश्व निर्माण केले होते. पण आपण जर तिच्याकडून ही जादू घेतली तर आपणही या सृष्टीवर राज्य करू असे वाटून माउई नावाच्या एका दैवी माणसाने तिचे हृदय (हार्ट) चोरले पण त्या नंतर सगळेच भयानक घडू लागले. लावा राक्षस जागा झाला आणि हिरवळीने भरलेले सर्व आयलंड राखेत रूपांतरीत व्हायला लागले. म्हणूनच मोआनाच्या आजीने तिला माउईला शोधून त्याच्या मदतीने ते हार्ट टीफीटी मध्ये घालायला सांगितले. तरच हे सारे पूर्वीसारखे सुंदर होईल आणि पुढची प्रमुख म्हणून तुला तुझ्या प्रजेला सुखी पाहण्याचे समाधान मिळेल असे सांगितले.
काही काळाने तिची आजी मृत्यूच्या जवळ असताना आजीच्या सांगण्यावरून वडील व इतरांच्या विरोधाला न जुमानता मोआनाचा प्रवास सुरु झाला. सुरुवातीला समुद्राच्या लाटांनी घाबरली असताना तिच्या आजीचा आत्मा आणि समुद्रदेवतेने तिला मदत करून एका बेटावर नेऊन ठेवले जिथे तिला माउई भेटला.
moana 4माउईचे कॅरेक्टर जेंव्हा पडद्यावर दिसते तेंव्हा मोआना आणि माउईची टशन, संवाद पाहून मजा येते. त्यातले त्याजे एक वाक्य जे तो heihei मोआनाचा छोटा कोंबडा हातात धरून त्याच्या चोचीने लिहितो आणि म्हणतो याला ट्विटर (Twitter) म्हणतात या वाक्याने थिएटर मध्ये हशा पसरतो. त्यानंतरचा त्यांचा माउईचे हरवलेले जादुई हुक मिळवण्याचा आणि नंतर लावा गॉड ला मारून टिफिटी मध्ये हार्ट परत बसवण्याचा प्रवास खूप रंजक दाखवला आहे. होडीची शीडं कशी बांधायची , ताऱ्यांचा , दिशांचा अंदाज कसा घ्यायचा हे जेंव्हा माउई मोआनाला शिकवतो तेंव्हा खूप मजेदार वाटते. ह्या चित्रपटातील गाणी चित्रपट संपल्यावर कदाचित लक्षात राहिली नाहीत तरी त्या गाण्याचे सीन्स नक्की आठवतात. माउई ला दिलेला 'ड्वेन जोनसन' चा आवाज आणि मोआनाच 'आवलीई क्रव्हाल्यो' चा आवाज , संवाद सारे काही खूप छान वाटते. चित्रपटाची पटकथा, त्यातले संवाद, त्यातले विनोद, त्याचं पार्श्वसंगीत आणि इतर बाबतींमध्ये तसं फार नाविन्य नाही; डिझनीचा नेहमीचा मसाला आहे आणि या चित्रपटातल्या बहुतेक भागांमध्ये तो सुंदर मुरला आहे.
ऍनिमेशन कडे पहिले तर कॅरेक्टर थोड्या रबराच्या बाहुल्यांप्रमाणे वाटतात पण तरीही लहानपणीची छोटीशी मोआना किंवा अगदी स्कर्ट टॉप मधील मोठेपणाची मोआना मनाला भावून जाते.
इतर कॅरेक्टरही त्या आयलंड मधील पूर्वीच्या कथांनुसार आडदांड शरीरयष्टी असणारे , अंगावर टॅटू गोंदलेले पुरुष , नाजूक बायका , छान निसर्ग सौंदर्य सर्वच खूप रंजक वाटते. एकूणच हा सिनेमा लहाननबरोबर मोठ्यांनाही मनोरंजनाची मेजवानी ठरणार हे नक्की!

- चंदा मंत्री (www.natakcinema.com)

 

 

 


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla