Education articles in English and Marathi
साठ्ये महाविद्यालयातील मार्च व एप्रिल महिन्यातील कार्यक्रम
Education Articles

साठ्ये महाविद्यालयातील मार्च व एप्रिल महिन्यातील कार्यक्रम

sathye collegeदरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा २७ फेब्रुवारी या वर्षी 'मराठी भाषा दिनाने ' मराठी वांड्मय मंडळाच्या वर्षभरातील कार्यक्रमांची सांगता झाली. 'टिळा मराठीचा' व 'मराठी स्वाक्षरी स्पर्धा' त्याच बरोबर माराठी शुद्धलेखनाचे नियम या विषयावरील व्याख्यान या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी साहित्य आणि भाषेला समृद्ध करणाऱ्या लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. भारुड ,अभंग, कीर्तन , लावणी, पोवाडा या लोककलांचे सादरीकरण आणि त्यांच्या विषयी माहिती देणाऱ्या शोध निबंधांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. २८ फेब्रुवारी रोजी मराठी शुद्धलेखनाचे नियम या विषयावर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची वांड्मयीन अभिरुची घडवणे ,भाषिक सलोखा निर्माण करणे अशी उद्दिष्टे साध्य झाली.

Read more...
 
साठये महाविद्यालयाला मुंबईतील सर्वोत्तम महाविद्यालयाचा पुरस्कार घोषित
Education Articles

साठये महाविद्यालयाला मुंबईतील सर्वोत्तम महाविद्यालयाचा पुरस्कार घोषित

IMG-20150127-WA0027विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालये असोसिएशनच्या साठये महाविद्यालयाला शैक्षणिक २०१३ – २०१४ साठीचे मुंबई शहरातले सर्वोत्तम महाविद्यालय हा पुरस्कार घोषित झाला आहे.मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

विद्यापीठाने यासंदर्भात पाठविलेल्या पत्रात साठये महाविद्यालयातील उत्कृष्ट,प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण अशा शिक्षणाचा गौरव केला आहे. तसंच विद्यापीठाना यात असेही नमूद केले आहे कि महाविद्यालयाचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वानीच महाविद्यालयाला हि उंची गाठून देण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.

साठये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.कविता रेगे यांनी हे एक सांघिक कार्याचे फळ असून यामुळे महाविद्यालयात अत्यंत उत्साह आणि आनंदाचे वातावरण असल्याचे सांगितले.

Read more...
 
साठ्ये महाविद्यालयातील डिसेंबर व जानेवारी महिन्यातील कार्यक्रम
Education Articles

साठ्ये महाविद्यालयातील डिसेंबर व जानेवारी महिन्यातील कार्यक्रम

sathye collegeसाठ्ये महाविद्यालयात प्रत्येक महिन्यात कार्यक्रमांची रेलचेल असते. पण नोव्हेंबर आणि डिसेंबर हा महिना कार्यक्रमांचा सुवर्णकाळ असतो.
दिनांक २२ नोव्हेंबर २०१४ रोजी 'प्राचीन भारतीय संस्कृती' विभागाने पानिपतच्या पेशवाईत सदाशिवराव भाऊंचे निर्णय बरोबर होते कि नव्हते यावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी अमेरिकास्थित श्री. सर्जेराव घार्गे - देशमुख यांनी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दिनांक २६ नोव्हेंबर २०१४ मानसशास्त्र विभागातर्फे ' THE HUB' या अमेरिकेतील गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्यातील संघर्षावर आधारित चित्रपट दाखवण्यात आला आणि नंतर याच विषयावर विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवण्यात आली.
१ व २ डिसेंबर २०१४ मराठी वांड़मय मंडळ आयोजित 'सप्तरंग' ही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा झाली. त्यात वक्तृत्व, वादविवाद, स्वरचित काव्यवाचन, निबंधलेखन, शब्दकोडे, एकपात्री व नाटुकली अशा ७ प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ३५ महाविद्यालयांनी सहभाग दर्शवला.

Read more...
 
साठ्ये महाविद्यालयातील ऑगस्ट व सप्टेंबर- २०१४ महिन्यातील झालेले कार्यक्रम …
Education Articles

साठ्ये महाविद्यालयातील ऑगस्ट व सप्टेंबर- २०१४ महिन्यातील झालेले कार्यक्रम

sathye collegeसाठ्ये महाविद्यालय विलेपार्ले पूर्व येथे दर महिन्या प्रमाणे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत विद्यार्थी व शिक्षकांसाठी बरेच कार्यक्रम , उपक्रम सादर झाले.

२२ ऑगस्ट रोजी जोशी बेडेकर आंतर महाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत महाविद्यालयाला तृतीय क्रमांक मिळाला. त्याच प्रमाणे घोषवाक्य स्पर्धेत महाविद्यालयाच्या प्रियांका कांबळे हिनेही तृतीय क्रमांक पटकावला. सांस्कृतिक उपक्रमांप्रमाणेच क्रीडा स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश पटकावले.
साठे महाविद्यालयाचा टेबल टेनिस चा १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने राज्यास्थरीय स्पर्धेत घवघवीत यश पटकावले. त्यांनी पुणे संघाला ३-० हरवून पहिला क्रमांक पटकावला.

Read more...
 
Postgraduate and Certificate Courses offered by Sathaye College
Education Articles

Postgraduate and Certificate Courses offered by Sathaye College

sathye collegeM.A.(Buddhist Studies): Graduate from Any University recognized by UGC (UG/Gen/104 of 1989)

The course has four semesters and is a credit based course. Students are expected to complete assignments or take tests as prescribed by University from time to time. This course is in a true sense an inter disciplinary course dealing with Buddhism and its importance in International relations in Ancient Period, Economy, Role of Buddhism in modern society, Buddhist Philosdphy,Art and Archaeology, Upon completion of course students can take up research or teaching. In addition to this students can take up government services
Course Timings : Thursday : 6 p.m. to 8 p. m.
Friday : 4 p.m. to 8 p.m.
Saturday : 2 p.m. to 8 p.m.
Sunday: 10 a.m. to 2 p.m.

Read more...
 
साठ्ये कॉलेजचे जून व जुलै महिन्यातील उपक्रम
Education Articles

साठ्ये कॉलेजचे जून व जुलै महिन्यातील उपक्रम

sathye collegeविलेपार्ले पूर्व येथील साठ्ये महाविद्यालयात २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील सांस्कृतिक कार्यक्रमांना जून महिन्यातच आरंभ झाला. २८ जून २०१४ रोजी 'कालिदास दिना' निमित्त कालिदास व पर्यावरण यांचा संबंध स्पष्ट करणारी National Geographic चे C. E. O. सौरभ महाडिक यांची मुलाखत घेतली. त्याच दिवशी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयात साठ्ये महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर तेथे आयोजित केलेल्या स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी सौरभ नाईक याने प्रथम क्रमांक पटकावला. 

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2

final-banner

muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla